Home Bibles मार्क 14:13 · मराठी बायबल
मार्क 14:13 · मराठी बायबल

येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले, “शहरात जा, आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हांला भेटेल, त्याच्या मागे जा.

Cross references

मत्तय 8:9

कारण मी स्वत: दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतो आणि माझ्या हाताखाली देखील अनेक शिपाई आहेत. मी एखाद्याला जा म्हणतो आणि तो जातो आणि दुसऱ्याला ये म्हटल्यावर तो येतो. मी माझ्या नोकराला अमूक कर असे सांगतो आणि तो ते करतो.”

मत्तय 26:18

येशू म्हणाला, “ज्याला मी ओळखतो अशा त्या माणसाकडे खेड्यात जा आणि त्याला म्हणा, ‘गुरूजी म्हणतात: माझी वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरी मी माझ्या शिष्यांसह वल्हांडण सण साजरा करणार आहे.”‘

मार्क 11:2

“तुम्ही जे गाव पुढे दिसते त्या गावात जा. गावात जाताच, ज्याच्यावर कोणी बसले नाही असे शिंगरू बांधलेले आढळेल. ते सोडा व येथे आणा.

लूक 19:30

“तुमच्यासमोर असलेल्या खेड्यात जा. तुम्ही प्रवेश करताच, ज्यावर कोणी बसले नाही असे शिंगरु तुम्हास आढळेल. ते सोडून येथे आणा.

लूक 22:10

तो त्यांना म्हणाला, “तुम्ही नगरात प्रवेश कराल तेव्हा पाण्याचे भांडे घेऊन जाणारा एक मनुष्य तुम्हांला भेटेल. तो ज्या घरात जाईल तेथे जा.

योहान 2:5

येशूची आई नोकरांना म्हणाली, “येशू तुम्हांला सांगेल तसे करा.”

योहान 15:14

मी आज्ञा करतो तसे तुम्ही वागता तर तुम्ही माझे मित्र आहात.

इब्री लोकांस 4:13

आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.

इब्री लोकांस 5:9

आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी अनंतकाळच्या तारणासाठी तो उगम झाला

Interlinear

Choose Theme