Home Bibles मार्क 13:14 · मराठी बायबल
मार्क 13:14 · मराठी बायबल

“जेव्हा तुम्ही ‘नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, (दानीयेल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगल पदार्थ) जो जिथे नको तेथे पाहाल. “ (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा)” तेव्हा जे येहूदीयांत आहेत त्यांनी डोंगरात पळून जावे.

Cross references

विलापगीत 1:10

शत्रूने हात लाबंवून तिच्या सर्व चांगल्या गोष्टी घेतल्या. खरे तर, तिने परकीय राष्टांना तिच्या मंदिरात जाताना पाहिले. पण परमेश्वरा, तू तर म्हणालास की ते आपल्या समूहात येऊ शकणार नाहीत.

यहेज्केल 44:9

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: ‘कोणीही खरोखरीची सुंता न झालेला परका जरी तो कायमचा इस्राएल लोकांच्यात राहत असला तरी-माझ्या मंदिरात येता कामा नये. मंदिरात येण्याआधी त्यांची सुंता केली गेलीच पाहिजे, व त्याने संपूर्णपणे मला वाहून घेतले पाहिजे.

दानीएल 8:13

मग मी एक पवित्र आवाज बोलताना ऐकला. त्याला दुसऱ्या पवित्र आवाजाने उत्तर दिले. पहिला आवाज म्हणाला, “नित्याच्या बळींचे काय होणार हे ह्या दृष्टान्तावरून दिसते. सर्वनाश करणाव्या पापाबद्दल हा दृष्टान्त आहे. राजाला लोक जेथे पूजतात, त्या जागेचा नाश झाल्यास काय होईल, हेच ह्याव ताऱ्रून दिसते. लोकांनी ती जागा पायाखाली तुडविल्यावर काय होईल हे ह्यावरून समजते. लोक यांवरून चालल्यावर. काय होईल, हेही कळून येते. पण हे किती वेळ चालेल?”

दानीएल 9:27

मग भावी नेता पुष्कळ लोकांबरोबर एक करार करील. तो करार एक आठवड्याचा असेल आठवड्याच्या मध्येच अर्पणे व बळी देणे बंद होईल. मग विध्वंसक येईल तो भयानक विध्वंसक कृत्ये करीलपण देवानेच त्याला संपूर्ण विनाशाची आज्ञा केलेली आहे.”

दानीएल 11:31

यरुशलेमच्या मंदिरात भयानक कृत्ये करण्यासाठी उत्तरेचा राजा सैन्या पाठवील ते सैन्य लोकांना नित्याचे होमार्पण अर्पणे करू देणार नाहीत.मग तो काह?तरी खरखरच भयंकर कत्य करतील विनाशास कारणीभत हणारी भयंकर गोष्ट ते स्थापन करतील.

दानीएल 12:11

“‘नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1290 दिवसांचा असेल.

मत्तय 13:51

येशूने शिष्यांना विचारले, “तुम्हांला या सर्व गोष्टी समजल्या काय?” तेव्हा ते म्हणाले, “होय.”

मत्तय 24:15

तुम्ही लोक जे हे वाचाल ते याचा अर्थ समजून घ्या.

लूक 21:20

जव्हा तुम्ही यरुशलेमाला सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हांला कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 8:30

मग फिलिप्प त्या रथाजवळ धावत धावत गेला, तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले, फिलिप्प त्याला म्हणाला, “तुम्ही जे वाचत आहात, त्याचा अर्थ तुम्हांना कळतो का?”

1 करिंथकरांस 14:7

हे निर्जीव वस्तू उदा. बासरी, वीणा यासारखे आवाज काढण्यासारखे आहे: जर ते वाद्य ते निर्माण करीत असलेल्या वेगवेगळ्या आवाजातील फरक स्पष्ट करीत नाही, तर एखाद्याला बासरीवर किंवा वीणेवर कोणते संगीत वाजवले जात आहे ते कसे कळेल?

1 करिंथकरांस 14:20

बंधूनो, तुमच्या विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.

प्रकटीकरण 1:3

जी व्यक्ती देवाकडून आलेल्या या संदेशाचे शब्द उघडपणे वाचते ती धन्य आहे. आणि जे लोक हा संदेशऐकतात आणि त्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी पाळतात ते धन्य आहेत. कारण आता जास्त वेळ उरला नाही.

प्रकटीकरण 13:18

ज्या माणसाला समजबुद्धी आहे, त्याने त्या प्राण्याच्या संख्ये अर्थशोधावा. ही संख्या मनुष्यांची संख्या आहे. त्यांची संख्या आहे 666.

Interlinear

Choose Theme