आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
Cross references
परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा.
असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
त्यावेळी दावीदाच्या वंशवृक्षाची एक चांगली शाखा मी वाढवीन ती ‘शाखा’ देशासाठी चांगल्या आणि योग्य गोष्टी करील.
मग कदाचित् याकोबच्या वंशजांचा मी त्याग केला असता आणि दावीदच्या वंशजांना, अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या वंशजांवर राज्य करु दिले नसते. पण दावीद माझा सेवक आहे आणि मला त्या लोकांची दया येईल आणि प्रेम वाटेल. मी कैद्यांना पुन्हा त्यांच्या मायभूमीत परत आणीन.”
मग मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन. माझा सेवक दावीद, ह्याला मी मेंढपाळ म्हणून नेमीन. तो त्यांना खायला घालील व त्यांच्या मेंढपाळ होईल.
“माझा सेवक, दावीद, हा त्यांचा राजा होईल. त्या सर्वांना मिळून एकच मेंढपाळ असेल. ते माझ्या नियमाप्रमाणे वागतील आणि माझ्या कायद्यांचे पालन करतील. मी त्यांना करायला सांगितलेल्या गोष्टी ते करतील.
ह्यानंतर इस्राएलचे लोक परत येतील. मग ते परमेश्वराला म्हणजेच त्यांच्या देवाला आणि दीवीदाला म्हणजेच त्यांच्या राजाला शोधतील. शेवटच्या दिवसांत, ते परमेश्वराचा व त्याच्या चांगुलपणाचा आदर करतील.
दाविदचा तंबू पडला आहे. पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन. मी भिंतींतील भगदाडे बुजवीन. उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन. मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.
ऐक! तू गरोदर राहशील, आणि तुला मुलगा होईल, त्याचे नाव तू येशू ठेव.
“स्वर्गात देवाला गौरव आणि ज्यांच्याबद्दल देव समाधानी आहे, त्या पृथ्वीवरील मनुष्यांत शांति”
ते म्हणाले, “‘प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो!’ स्वर्गात शांति आणि उर्ध्वलोकी देवाला गौरव!”