Home Bibles मार्क 10:49 · मराठी बायबल
मार्क 10:49 · मराठी बायबल

मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा. तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्याला बोलाविल आणि म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलावीत आहे.”

Cross references

स्तोत्रसंहिता 86:15

प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.

स्तोत्रसंहिता 145:8

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.

मत्तय 20:32

मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”

लूक 18:40

येशू थांबला, आणि त्याने आंधळ्याला आपणांकडे आणण्याची आज्ञा केली, जेव्हा आंधळा जवळ आला, तेव्हा येशूने त्याला विचारले,

योहान 11:28

आणि असे म्हटल्यानंतर ती परत गेली आणि आपली बहीण मरीया हिला एका बाजूला बोलाविले आणि म्हणाली, “गुरुजी येथे आहेत. आणि ते तुला विचारीत आहेत.”

इब्री लोकांस 2:17

या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा मुख्य याजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायशिचत करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.

इब्री लोकांस 4:15

कारण आपल्याला लाभलेला माहन याजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूति दर्शविण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे निष्पाप राहिला.

Interlinear

Choose Theme