Home Bibles लूक 9:61 · मराठी बायबल
लूक 9:61 · मराठी बायबल

दुसरा म्हणाला, “मी तुला अनुसरेन, प्रभु पण अगोदर मला माझ्या घरातील लोकांचा निरोप घेऊ दे.”

Cross references

अनुवाद 33:9

हे परमेश्वरा, आपल्या कुटुंबियांपेक्षाही त्यांनी तुला आपले मानले. आपल्या आईवडीलांची कदर केली नाही. भाऊबंदांना ओळख दाखवली नाही. पोटच्या पोरांची पर्वा केली नाही. पण तुझ्या आज्ञांचे पालन केले. तुझा पवित्र करार पाळला.

1 राजे 19:20

अलीशाने लगेच बैल सोडून दिले आणि तो एलीयाच्या मागे धावत गेला. अलीशा त्याला म्हणाला, “मला माझ्या आईवडीलांचा निरोप घेऊ दे. मग मी तुझ्याबरोबर येतो.”एलीया म्हणाला, “ठीक आहे, जा माझी काही हरकत नाही.”

उपदेशक 9:10

प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.

मत्तय 10:37

“जो माझ्यापेक्षा स्वत:च्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीति करतो, तो मला योग्य नाही.

लूक 14:18

ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्याला म्हणाला, “मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपा करुन मला क्षमा कर.’

लूक 14:26

“जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वत:च्या जिवाचासुद्धा द्धेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.

Interlinear

Choose Theme