Home Bibles लूक 9:49 · मराठी बायबल
लूक 9:49 · मराठी बायबल

परंतु योहानाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही कोणाला तरी तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, व आम्ही त्याला मना केले, कारण आम्ही जे तुम्हांला अनुसरतो त्यापैकी तो नाही.”

Cross references

गणना 11:27

तेव्हा एका तरुणाने पळत जाऊन मोशेला हे सांगितले. तो म्हणाला, “एलदाद व मेदाद हे छावणीत संदेश सांगत आहेत.”

मार्क 9:38

योहान येशूला म्हणाला, “गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भुते काढताना पाहिले आणि आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला कारण तो आपल्यापैकी नव्हता.”

मार्क 10:13

त्याने त्यांना स्पर्श करावा, यासाठी लोक लहान बालकांना त्याच्याकडे आणीत होते. परंतु शिष्यांनी त्यांना दटावले

लूक 5:5

शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.”

प्रेषितांचीं कृत्यें 4:18

मग यहूदी पुढान्यांनी पेत्र व योहान यांना परत आत बोलाविले. त्यांनी प्रेषितांना सांगितले की, येशूच्या नावाने काही करु नका व शिकवू नका.

प्रेषितांचीं कृत्यें 5:28

तो म्हणाला, “आम्ही तुम्हांला (येशू) या मनुष्याच्या नावाने शिक्षण देऊ नका म्हणून ताकीद दिली होती. आणि तरीही तुम्ही तुमच्या शिकवणुकीचा प्रसार सर्व यरुशलेमभर केलात. आणि या मनुष्याच्या (येशूच्या) मरणाचा दोष आमच्यावर ठेवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करीत आहात.”

1 थेस्सलनीकाकरांस 2:16

यहूदीतर लोकांचे तारण होण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलायला हवे, परंतु ते आम्हांला मना करुन एक प्रकगरे पापच करीत आहेत. ते या पापाद्वारे जे ते नेहमी करीत आले आहेत आपल्या पापाचे माप भरत आले आहेत. आणि आता शेवटी आणि पूर्णतेने देवाचा क्रोध त्यांच्यावर ओढवला आहे.

3 योहान 1:9

मी मंडळीला पत्र लिहिले पण दियत्रेफस ज्याला त्यांचा नेता व्हायचे आहे व जे सांगतो ते तो स्वीकारीत नाही.

Interlinear

Choose Theme