Home Bibles लूक 7:33 · मराठी बायबल
लूक 7:33 · मराठी बायबल

बाप्तिस्मा करणारा योहान हा भाकर किंवा द्राक्षारस खात किंवा पीत आला नाही. पण तुम्ही म्हणता, “त्याला भूत लागले आहे.’

Cross references

यिर्मया 16:8

“यिर्मया, ज्या घरात मेजवानी सुरु आहे, अशा घरात तू जाऊ, नकोस, अशा घरात खाऊ पिऊ नकोस.

मत्तय 3:4

योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे.

मत्तय 10:25

विद्यार्थी आपल्या शिक्षकासारखा व नोकर आपल्या मालकासारखा होणे, इतके पुरे. जर घराच्या धन्याला त्यांनी बालजबूल म्हटले तर घरातील इतर माणसांना ते किती वाईट नावे ठेवतील!”

मार्क 1:6

योहान उंटाच्या केसांपासून केलेली वस्त्रे वापरीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता आणि तो टोळ व रानमध खात असे.

लूक 1:15

देवाच्या दृष्टीने तो महान होईल. त्याने कोणतेही कडक पेय किंवा मद्य पिऊ नये. आणि तो आईच्या गर्भात असल्यापासूनच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.

योहान 8:48

यहूदी म्हणाले, “तुम्ही शोमरोनी आहात, तुम्हांला भूताने पछाडले आहे, असे आम्ही म्हणालो तर आम्ही म्हणतो तेच बरोबर नाही काय?”

योहान 8:52

यहूदी लोक म्हणाले, “तुमच्यात खरोखर भूत संचारले आहे. हे आता आम्हांला माहीत झाले. अब्राहाम आणि संदेष्टे मेले. परंतु तुम्ही म्हणता, ‘जो माझ्या शिकवणूकीचे पालन करतो तो कधीच मरणार नाही.’

योहान 10:20

यहूदी लोकांपैकी पुष्कळजण म्हणाले, ‘याला भूत लागले आहे. म्हणून याचे डोके ठिकाणावर नाही. त्याचे का ऐकावे?”

प्रेषितांचीं कृत्यें 2:13

दुसरे लोक प्रेषितांना हसत होते. त्यांना असे वाटले की, प्रेषित द्राक्षारस खूप प्रमाणात प्यालेले आहेत.

Interlinear

Choose Theme