येशून उत्तर दिले. “पवित्र शास्त्रत असेही म्हटले आहे,“तु प्रभु, तुझा देव याची परीक्षा पाहू नकोस.”‘ अनुवाद 6:16
Cross references
“मस्सा येथे तुम्ही आपला देव परमेश्वर याची परीक्षा पाहिलीत, तसे इथे करु नका.
तुझ्या पूर्वजांनी माझी परीक्षा पाहिली, त्यांनी माझी पारख केली आणि मी काय करु शकतो ते त्यांना दिसले.
आमचे पूर्वज वाळवंटात भुकेले झाले आणि त्यांनी शुष्क झालेल्या भूमीत देवाची परीक्षा पाहिली.
गर्विष्ठ लोक सुखी आहेत, असे आम्हाला वाटते. दुष्टांना यश मिळते. वाईट कृत्ये करुन ते देवाचा अंत पाहतात पण देव त्यांना शिक्षा करीत नाही.”
येशूने त्याला उत्तर दिले, “असे सुद्धा लिहिले आहे की, ‘देव जो तुझा प्रभु याची परीक्षा पाहू नको.”‘ अनुवाद 6:16
आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले.
तर आपली अंत:करणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे तुम्ही अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली,