Home Bibles लूक 23:32 · मराठी बायबल
लूक 23:32 · मराठी बायबल

दोन दुसरी माणसे जी दोघेही गुन्हेगार होती, त्यांनाही मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी नेत होते.

Cross references

यशया 53:12

ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”

मत्तय 27:38

येशूच्या दोन्ही बाजूंना दोन लुटारु खिळण्यात आले होते.

मार्क 15:27

त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारूंना एकाला त्याच्या उजविकडे व दुसऱ्याला त्याच्या डावीकडे वधस्तंभावर खिळले होते.

लूक 22:37

कारण मी तुम्हांस सांगतो, हा शास्त्रभाग माझ्यामध्ये परिपूर्ण झालाच पाहिजे:“आणि तो अपराधी असा गणला गेला.’ यशया 53:12होय, हा माझ्याविषयीचा संदर्भ पूर्ण होत आहे.”

योहान 19:18

गुलगुथा येथे त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकले. त्यांनी आणखी दोन मनुष्यांनासुद्वा वधस्तंभावर खिळले. त्या दोघांना त्यांनी येशूच्या दोन्ही बाजूंना खिळले व मध्ये येशूला खिळले.

इब्री लोकांस 12:2

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

Interlinear

Choose Theme