Home Bibles लूक 20:42 · मराठी बायबल
लूक 20:42 · मराठी बायबल

कारण दावीद स्वत: स्तोत्राच्या पुस्तकात म्हणतो,“प्रभु माइया प्रभूला म्हणाला: तू माइया उजवीकडे बैस,

Cross references

2 शमुवेल 23:1

दावीदाची ही अखेरची वचने;इशायपुत्र दावीदाचा हा संदेश देवामुळे ज्याला थोरवी प्राप्त झाली त्याचा हा संदेश. याकोबच्या देवाचा हा अभिषिक्त राजा इस्राएलचा गोड गळ्याचा गायक

स्तोत्रसंहिता 110:1

परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला, “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन. माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”

मत्तय 22:43

त्यावर येशू त्यांना म्हणाला, मग दाविदाने त्याला प्रभु असे का म्हटले? दाविदाच्या अंगी पवित्र आत्मा आला असता तो म्हणाला,

मार्क 12:36

दावीद स्वत: पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन म्हणाला, ‘प्रभु देव, माझ्या प्रभुला म्हणाला, मी तुझे वैरी तुझ्या पायाखाली घालेपयंर्त तू माझ्या उजवीकडे बैस.” स्तोेत्र. 110:1

लूक 24:44

तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”

प्रेषितांचीं कृत्यें 1:20

पेत्र म्हणाला, “स्तोत्रसांहितेत (यहूदाविषयी) असे लिहिले आहे:‘त्याच्या जमिनीजवळ (मातमत्तेजवळ) लोक न जावोत; कोणीही तिच्यात वस्ती न करो!’ स्तोत्र. 69:25आणखी असे लिहिले आहे: ‘त्याचा कारभार दुसरा घेवो.’ स्तोत्र. 109:8

प्रेषितांचीं कृत्यें 2:34

दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वत: म्हणाला,‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला: मी तुझे वैरी

प्रेषितांचीं कृत्यें 13:33

आम्ही त्यांची लेकरे (वंशज) आहोत आणि देवाने हे अभिवचन आमच्या बाबतीत खरे करुन दाखविले. देवाने हे येशूला मरणातून पुन्हा उठविण्याद्वारे केले. आम्ही याविषयी स्तोत्रसंहितातेमध्येसुद्धा वाचतो:‘तू माझा पुत्र आहेस. आज मी तुझा पिता झालो आहे.’ स्तोत्र. 2:7

1 करिंथकरांस 15:25

कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे.

इब्री लोकांस 1:13

तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही,“तुझ्या वैऱ्याला तुझ्या पायाखाली घालेपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.”स्तोत्र. 110:1

इब्री लोकांस 3:7

म्हणून, पवित्र आत्मा म्हणतो, त्याप्रमाणे,“आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल,

Interlinear

Choose Theme