तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्तयाने पुढे जाणार होता.
Cross references
राजाने इस्राएलला वैभवाच्या शिखरावर नेले. यरुशलेम नगरात चांदी दगडधोंड्यारखी आणि गंधसरुचे लाकूड डोंगरटेकड्यांवर उगवणाऱ्या उंबराच्या झाडासारखे विपुल होते.
गेदेरचा बाल-हानान हा जैतूनची झाडे आणि पश्चिमे कडच्या डोंगराळ भागातली उंबराची झाडे याचा प्रमुख होता. योवाश जैतूनच्या तेलाच्या कोठाराचा प्रमुख होता.
देवाने त्यांच्या द्राक्षवेलींचा नाश करण्यासाठी गारांचा पाऊस पाडला आणि झाडांचा नाश करण्यासाठी त्याने बफर्ाचा उपयोग केला.
“ह्या विटा पडल्या तर आम्ही पुन्हा बांधकाम करू आणि तेही भक्कम दगडांचे, ही लहान झाडे कापली जातील पण आम्ही त्यांच्या जागी उंच व भक्कम असे नवे वृक्ष लावू.”
मग आमोस अमास्याला म्हणाला, “मी धंदेवाईक संदेष्टा नाही. मी संदेष्ट्यांच्या घराण्यातीलही नाही. मी गुरे राखत होतो. आणि उंबरांच्या झाडांची निगा राखत होतो.
परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना. ते छपरावर गेले, आणि त्याला खाटेसाहित आत सोडले, कौले काढून बरोबर मध्यभागी जेथे येशू बसला होता तेथे सोडले.