Home Bibles लूक 17:35 · मराठी बायबल
लूक 17:35 · मराठी बायबल

दोन स्त्रिया धान्य दळत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.

Cross references

निर्गम 11:5

आणि मिसरमधील प्रत्येक प्रथम जन्मलेला मुलगा मरण पावेल. (मिसर देशाचा राजा) फारो याचा प्रथम जन्मलेला मुलगा याच्यापासून तर दळण दळणाऱ्या दासीच्या प्रथम जन्मलेल्या मुलापर्यंत सर्व मुलगे मरण पावतील. प्रथम जन्मलेले पशू देखील मरतील.

शास्ते 16:21

मग पलिष्ट्यांनी शमशोनला पकडले. त्यांनी त्याचे डोळे फोडले. ते त्याला गज्जा शहरात घेऊन गेले. तो निसटून जाऊ नये म्हणून त्याला त्यांनी साखळदंडांनी आवळून बांधले. तसेच त्याला तुरूंगात ठेवले व जात्यावर घान्य दळायला लावले.

मत्तय 24:41

दोन स्त्रिया जात्यावर धान्य दळत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील.

Interlinear

Choose Theme