Home Bibles लूक 17:13 · मराठी बायबल
लूक 17:13 · मराठी बायबल

ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “येशू, गुरुजी आम्हांवर दया करा!”

Cross references

मत्तय 9:27

तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “दाविदाच्या पुत्रा, आम्हांवर दया करा.”

मत्तय 15:22

तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभु, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भुताने पछाडली आहे.”

मत्तय 20:30

रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, प्रभु येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.”

मार्क 9:22

पुष्कळदा ठार करण्यासाठी तो त्याला अग्नीत किंवा पाण्यात टाकीत असे. परंतु आपण काही करत असाल तर आम्हांवर दया करा. आणि आम्हांला मदत करा.”

लूक 5:5

शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.”

लूक 18:38

तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “येशू दाविदाच्या पुत्रा माझ्यावर दया कर!”

Interlinear

Choose Theme