तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, “मग तुला मी विनंति करतो की पित्या, लाजाराला माझ्या पित्याच्या घरी पाठव,
Cross references
दुष्टाचे आयुष्य संपल्यावर तो मरतो. तो मागे राहिलेल्या कुटुंबाची पर्वा करीत नाही.
ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.
थोड्याच काळानंतर इथे दुष्ट लोक राहाणार नाहीत. तू त्यांना शोधण्याचा प्रयत्न करु शकतोस पण ते निघून गेलेले असतील.
आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवणाऱ्या अशामूर्ख लोकांचे असेच होते.
म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
मी जे अपार कष्ट केले त्याचा मी किरस्कार करू लागलो. मी खूप कष्ट केले. परंतु त्या कष्टांनी मी जे मिळवले ते माझ्यानंतर जे लोक राहतील त्याना मिळणार आहे. मी त्या गोष्टी माझ्याबरोबर नेऊ शकणार नाही.