Home Bibles लूक 16:14 · मराठी बायबल
लूक 16:14 · मराठी बायबल

मग जे परुशी धनलोभी होते, त्यांनी हे सर्व ऐकले व त्यांनी त्याचा उपहास केला.

Cross references

स्तोत्रसंहिता 35:15

परंतु मी जेव्हा चूक केली तेव्हा ते लोक मला हसले ते लोक सच्चे मित्र नव्हते. मी त्यांना नीट ओळखत देखील नव्हतो परंतु ते माझ्या भोवती गोळा झाले आणि ते त्यांनी माझ्यावर हल्ला केला.

स्तोत्रसंहिता 119:51

तला माझ्यापेक्षा चांगले समजाता त्यांनी माझा सतत अपमान केला. पण मी तुझ्या शिकवणी नुसार वागणे सोडले नाही.

यशया 53:3

लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व व्यथित माणूस होता. घृणा व दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही.

यशया 56:11

ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत. त्यांचे कधीच समाधान होत नाही. मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही. ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत. ते हावरट आहेत. त्यांना फक्त स्वत:चा लाभ हवा आहे.

यिर्मया 6:13

“इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात.

यिर्मया 8:10

म्हणून मी त्यांच्या बायका दुसऱ्यांना देईन. त्यांची शेते नव्या मालकांना देईन. इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अती महत्वाचे व अति सामान्य सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत सर्व खोटे बोलतात.

यिर्मया 20:7

परमेश्वरा, तू मला मोहित केलेस आणि मी पण मोहित झालोतू माझ्यापेक्षा समर्थ असल्याने तू जिंकलास मी हास्यास्पद ठरलो. लोक माझ्याकडे पाहून हसतात आणि माझी चेष्टा करतात.

यहेज्केल 22:25

यरुशलेममधील संदेष्टे कट करीत आहेत. ते संदेष्टे सिंहासारखे आहेत. शिकारीचा समाचार घेताना तो गर्जना करतो. त्या संदेष्टांनी खूप आयुष्यांचा नाश केला, त्यांनी पुष्कळ किंमती वस्तू बळकावल्या आहेत, यरुशलेममधील अनेक स्त्रियांच्या वैधव्याला ते कारणीभूत झाले.

यहेज्केल 33:31

म्हणून ते माझे लोक असल्यासारखे तुझ्याकडे येतात. ते माझे लोक असल्याप्रमाणे ते करणार नाहीत. ते त्यांना भावते तेच करु इच्छितात. ते लोकांना फसवून खूप पैसा मिळवू बघतात.

मत्तय 23:13

अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, हाय, हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाहीत. तुम्ही स्वत: तर आत जात नाहीच पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत.

लूक 8:53

पण ते त्याला हसले. कारण त्यांना माहीत होते की ती मेली आहे.

लूक 12:15

मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वत:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”

लूक 20:47

ते विधवांची घरे खाऊन फस्त करतात आणि देखाव्यासाठी लांब लांब प्रार्थना करतात. या माणसांना अत्यंत वाईट शिक्षा होईल.

लूक 23:35

लोक तेथे पाहात उभे होते. आणि पुढारी थट्टा करुन म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचविले, जर तो ख्रिस्त, देवाचा निवडलेला असेल तर त्याने स्वत:ला वाचवावे!”

2 तीमथ्थाला 3:2

लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, शिव्याशाप देणारे, आईवडिलांची आज्ञा न मानणारे, कृतघ्र, अधार्मिक

इब्री लोकांस 11:36

काहींना निंदा व चाबकाचा मार सहन करावा लागला. तर काहींना बेड्या व तुरूगंवास भोगावे लागले.

इब्री लोकांस 12:2

जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केंद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या सिंहासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.

Interlinear

Choose Theme