Home Bibles लूक 12:50 · मराठी बायबल
लूक 12:50 · मराठी बायबल

माझ्याकडे बाप्तिस्मा आहे व तो मला घ्यावयाचा आहे. आणि तो होईपर्यंत मी किती अस्वस्थ आहे!

Cross references

स्तोत्रसंहिता 40:8

माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे.

मत्तय 20:17

येशू यरूशलेमला चालला होता. तो चालत असता त्याने त्याच्या शिष्यांना बाजूला घेतले, आणि त्यांना म्हणाला,

मार्क 10:32

ते वर यरूशलेमेच्या रस्त्यावरून जात असता येशू त्यांच्यापुढे चालत होता. त्याचे शिष्य विस्मित झाले होते आणि त्याच्यामागून येणारे घाबरले होते. नंतर येशूने त्या बारा शिष्यांना पुन्हा एका बाजूला घेतले आणि स्वत:च्या बाबतीत काय घडणार आहे हे त्यांना सांगू लागला.

योहान 4:34

येशू म्हणाला, “ज्याने मला पाठवीले त्याच्या ईच्छेप्रमाणे करणे हेच माझे अन्न! त्याने मला दिलेले काम पूर्ण करणे हेच माझे अन्न होय.

योहान 7:6

येशू आपल्या भावांना म्हणाला. ‘माझी योग्य वेळ अजून आलेली नाही. पण तुम्ही जाण्यासाठी मात्र कोणतीही वेळ योग्य असेल.

योहान 7:10

म्हणून येशूचे भाऊ सणासाठी तेथून निघून गेले. ते गेल्यावर मग येशूही गेला. परंतु येशूने हे लोकांना उघडपणे दाखविले नाही.

योहान 10:39

यहूदी लोकांनी येशूला पुन्हा धरण्याचा प्रयत्न केला. परंतु येशू त्यांच्यातून निघून गेला.

योहान 12:27

“माझे अंत:करण व्याकूळ झाले आहे. आणि मी आता काय सांगू? “पित्या माझी या घटकेपासून सुटका कर? केवळ याच कारणासाठी या वेळेला मी आलो.

योहान 18:11

येशूने पेत्राला आज्ञा केली, “तुझी तलवार तिच्या जागेवर ठेव! पित्याने दिलेला प्याला मी पिऊ नये काय?”

योहान 19:30

येशू आंब घेतल्यावर म्हणाला, “पूर्ण झाले आहे.” मग त्याने आपले डोके लववून आपला आत्मा सोडून दिला.

प्रेषितांचीं कृत्यें 20:22

आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेमला चाललो आहे, आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही.

Interlinear

Choose Theme