Home Bibles लूक 12:36 · मराठी बायबल
लूक 12:36 · मराठी बायबल

लग्नाच्या मेजवानीवरुन त्यांचा मालक परत येईल अशी वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा. यासाठी की जेव्हा तो येतो व ठोठाठतो तेव्हा त्याच्यासाठी ते ताबडतोब दार उघडतील.

Cross references

उत्पत्ति 49:18

“हे परमेश्वरा, तुझ्या कडून उध्दार होण्याची मी वाट पाहात आहे.”

गीतरत्न 5:5

माझ्या प्रियकराला दार उघडायला मी उठले. माझ्या हातातून गंधरस गळत होता. इतर सुवासिक द्रव्ये माझ्या बोटांतून कुलुपाच्या कडीवर गळत होती.

यशया 64:4

तुझ्या लोकांनी, खरोखर कधीच, तुझे ऐकले नाही, तू सांगितलेल्या गोष्टींकडे कधीच खरोखर लक्ष दिले नाही. कोणीही तुझ्यासारखा देव अजून पाहिला नाही. तुझ्याशिवाय दुसरा देव नाही-फक्त तूच आहेस. लोकांनी संयम पाळल्यास आणि तुझ्या मदतीची वाट पाहिल्यास, तू त्यांच्यासाठी महान गोष्टी करशील.

विलापगीत 3:25

परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो.

मत्तय 22:1

येशूने त्यांच्याशी बोलण्यास सूरुवात करून पुन्हा एकादा बोधकथेचा वापर केला. तो म्हणाला,

मत्तय 24:42

“म्हणून तुम्ही तयार असा, कारण तुम्हांला माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभु येत आहे,

मत्तय 25:1

“त्या दिवसांत स्वर्गाचे राज्य दहा कुमारिकांसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.

मार्क 13:34

ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासाला निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पाहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो.

लूक 2:25

यरुशलेम येथे एक मनुष्य होता, त्याचे नाव शिमोन होते; तो नीतिमान आणि भक्तिशील होता. इस्राएलाचे सांत्वन होण्याची तो वाट पाहत होता आणि पवित्र आत्मा त्याच्यावर होता.

याकोब 5:7

यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.

2 पेत्र 1:13

तरी हे सांगणे मी अगदी योग्य समजतो की, जोपर्यंत याशरीराने मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्हांला आठवण करुन देऊन जागे ठेवणे योग्य आहे.

यहूदा 1:20

पण तुम्ही प्रिय मित्रांनो, आपल्यापवित्र शिकविण्यात आलेल्या विश्वासात परस्परांना आध्यात्मिक रीतीने बळकट करा.पवित्र आत्म्याने युक्त होऊन प्रार्थना करा.

प्रकटीकरण 3:20

मी येथे आहे! मी दाराजवळ उभा राहतो व दार ठोठावतो. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो,तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबोरबर जेवेल.

Interlinear

Choose Theme