Home Bibles लूक 12:18 · मराठी बायबल
लूक 12:18 · मराठी बायबल

मग तो म्हणाला, “मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन.

Cross references

स्तोत्रसंहिता 17:14

परमेश्वरा, तुझ्या शक्तीचा उपयोग करुन, या दुष्टांना इहलोकातून नाहीसे कर. परमेश्वरा, तुझ्याकडे मदतीसाठीखूप लोक येतात. त्या लोकांकडे या आयुष्यात फारसे काही नसते. त्या लोकांना खूप अन्न दे. त्यांच्या मुलांना जे काही हवे ते दे. त्यांच्या मुलांना इतके अन्न दे की ते त्यांच्याही मुलांना पुरुन उरेल.

लूक 12:21

“जो कोणी स्वत:साठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”

लूक 18:4

काही काळ त्याची इच्छा नव्हती पण शेवटी तो स्वत:शीच म्हणाला, “मी जरी देवाला भीत नाही व लोकांना मान देत नाही.

लूक 18:6

मग प्रभु म्हणाला, “अनीतिमान न्यायाधीश काय म्हणाला त्याकडे लक्ष द्या.

याकोब 3:15

कारण अशा प्रकारचे शहाणपण वरून, स्वर्गातून आलेले नाही, तर ते पृथ्वीवरचे आहे. अधार्मिक आणि सैतानी आहे.

याकोब 4:15

त्याऐवजी, तुम्ही नेहमी असे म्हणा, “जर प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि आपण हे किंवा ते करू.”

Interlinear

Choose Theme