म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मराला गेला. खरोखर मी तुम्हांस सांगतो या पिढिला ते भरुन द्यावे लागेल.
Cross references
काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या. “तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.
तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा मुलगा. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.”‘
म्हणून तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस. ह्या राष्ट्रांने परमेश्वराच्या म्हणजेच त्यांच्या देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत. त्या राष्ट्रांतील लोकांनी देवाची शिकवण ऐकली नाही. त्यांना खरी शिकवण माहीत नाही.
बरेख्या मुलगा जखऱ्या ह्याला परमेश्वराचा संदेश मिळाला. पारसचा राजा दारयावेश याच्या कारकिर्दीला एक वर्ष आणि आठ महिने झाले, तेव्हाची ही गोष्टी. (जखऱ्या बरेख्याचा मुलगा व बरेख्या प्रेषित इद्दोचा मुलगा होय.) हा संदेश पुढीलप्रमाणे होता:
म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल. हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल. आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल. त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते. हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्याकाळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले, त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल.
विश्वासामुळेच हाबेलाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला. देवाने हाबेलाची दाने मान्य केल्यामुळे विश्वासाच्याद्वारे तो धार्मिक म्हणून उंचावण्यात आला, आणि जरी तो मेला असला तरी तो आपल्या विश्वासामुळे अजून बोलतो.
आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी सांगते.
काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा)होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसेकेले कारण त्याची स्वत:ची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.