Home Bibles लूक 11:45 · मराठी बायबल
लूक 11:45 · मराठी बायबल

नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.”

Cross references

1 राजे 22:8

राजा अहाब म्हणाला, “तसा आणखी एक संदेष्टा आहे. इम्ला याचा मुलगा मीखाया. पण मी त्याचा द्वेष करतो. कारण तो काही सांगतो तेव्हा माझ्याबद्दल कधीच चांगले भविष्यकथन करत नाही. त्याचे बोलणे मला अप्रिय वाटते.”यहोशाफाट म्हणाला, “अहाब राजा, तुझे असे बोलणे बरोबर नव्हे.”

यिर्मया 6:10

मी कोणाशी बोलू शकतो? मी कोणाला इशारा देऊ शकतो? माझे कोण ऐकेल? इस्राएलच्या लोकांनी आपले कान बंद करुन घेतले आहेत. म्हणून ते माझा इशारा ऐकू शकत नाहीत. लोकांना परमेश्वराची शिकवण आवडत नाही. त्यांना परमेश्वराचा संदेश ऐकावासा वाटत नाही.

यिर्मया 20:8

प्रत्येक वेळी मी बोलतो, ओरडतो मी हिंसा आणि विध्वंस ह्याबद्दल आरडाओरड करतो. मी मला परमेश्राकडून आलेला संदेश लोकांना सांगतो. पण लोक माझा फक्त अपमान करतात आणि माझी चेष्टा करतात.

आमोस 7:10

बेथेल येथील एक याजक अमस्या ह्याने, “इस्राएलचा राजा यराबाम ह्याला पुढील निरोप पाठविला. आमोस तुझ्याविरुध्द उठाव करावा म्हणून प्रयत्न करीत आहे. तो इतका बोलतोय की हा देश त्याचे सर्व शब्द मानू शकत नाही.

मत्तय 22:35

एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होता. त्या परूश्यानी येशूची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला.

लूक 11:46

तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओझे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही.

लूक 11:52

“नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे. तुम्ही स्वत:ही आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”

योहान 7:7

जग तुमचा द्वेष करु शकत नाही. परंतु जग माझा द्वेष करते. कारण जगातील लोक वाईट कामे करतात हे मी त्यांना सांगातो.

योहान 7:48

पुढाऱ्यांपैकी एकाने तरी येशूवर विश्वास ठेवला का? नाही! आम्हा परुश्यांपैकी एकाने तरी त्याच्यावर विश्वास ठेवला का? नाही!

योहान 9:40

परुश्यांतील काही जण येशूच्या आजूबाजूला होते. त्यांनी येशूला हे बोलताना ऐकले. आणि त्यांनी विचारले, “काय, आम्हीसुद्धा आंधळे आहोत असे तुला म्हणायचे आहे काय?”

Interlinear

Choose Theme