Home Bibles लूक 11:31 · मराठी बायबल
लूक 11:31 · मराठी बायबल

दक्षिणेकडची राणीन्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक थेथे आहे.

Cross references

1 राजे 10:1

शबाच्या राणीने शलमोनाची ख्याती ऐकली तेव्हा अवघड प्रश्न विचारुन त्याची कसोटी पाहायला ती आली.

2 इतिहास 9:1

शलमोनाची कीर्ती शबाच्या राणीच्या कानावर गेली. तेव्हा त्याची परीक्षा पाहायला म्हणून ती यरुशलेमला आली. तिच्याबरोबर मोठा लवाजमा होता. मसाल्याचे पदार्थ, सोनेनाणे, मौल्यवान रत्ने या गोष्टी उंटांवर लादून तिने आणल्या होत्या.शलमोनाची भेट घेऊन ती त्याच्याशी बोलली. तिला शलमोनाला बरेच प्रश्न विचारायचे होते.

यशया 9:6

असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”

यशया 54:17

“लोक तुझ्याविरूध्द लढण्यासाठी शस्त्रे तयार करतील. पण ती शस्त्रे तुझा पराभव करणार नाहीत. काही लोक तुझ्याविरूध्द बोलतील पण जो असे बोलेल त्याला त्याची चूक दाखवून दिली जाईल.”देव म्हणतो, “देवाच्या सेवकांना काय मिळेल? त्यांना माझ्याकडून आलेल्या चांगल्या गोष्टी मिळतील.”

यिर्मया 3:11

परमेश्वर मला म्हणाला, “इस्राएल माझ्याशी निष्ठावंत नाही. पण विश्वासघातकी यहूदापेक्षा तिच्याकडे सबळ सबबी होत्या.

मत्तय 12:42

न्यायाच्या दिवशी दक्षिणेची राणीया पिढीबरोबर उभी राहून हिला दोषी ठरवील. कारण शलमोनाचे ज्ञान ऐकायला ती पृथ्वीच्या शेवटापासून आली. आणि शलमोनापेक्षा महान असा कोणी येथे आहे.

लूक 3:22

आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रुपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून एक वाणी आली: “तू माझा प्रिय पुत्र आहेस, मी तुइयाविषयी फार संतुष्ट आहे.”

लूक 9:35

आणि त्यानां वेढलेल्या ढगातून एक वाणी ऐकू आली; ती म्हणाली, “हा माझा पुत्र आहे; तो माझा निवडलेला आहे, त्याचे ऐका.”

रोमकरांस 2:27

ज्या मनुष्याची शारीरिक रीतीने सुंता झाली नाही आणि जो नियमशास्त्र पूर्ण करतो, तो ज्या तुम्हांला लिखित नियम व सुंता आहे, तरी नियमशास्त्र मोडता त्या तुमचा न्याय करील.

कलस्सैकरांस 1:15

तो अदृश्य देवाची प्रतिमा आहे आणि निर्माण केलेल्या सर्व गोष्टीत तो प्रथम आहे.

इब्री लोकांस 11:7

ज्या गोष्टी अजून पाहिल्या नव्हत्या, अशा गोष्टींच्या बाबतीत नोहाला सावधान करण्यात आले होते तेव्हा त्याने विश्वासाने त्याची दखल घेतली. आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी जहाज बांधले, विश्वासामुळेच त्याने जगाचा धिक्कार केला आणि विश्वासामुळे लाभणाऱ्या धार्मिकतेचा तो वारस बनला.

Interlinear

Choose Theme