त्या घरात तुम्हांला जे देतील ते खातपीत राहा. कारण कामकरी हा त्याच्या मजुरीस पात्र आहे. या घरातून त्या घरात असे घर बदलू नका.
Cross references
उरलेले तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्यांनी खावा. तुम्ही दर्शन मंडपात जे काम करता त्याबद्दलची ही मजुरी आहे.
येताना आपली मुलेबाळे, नोकरचाकर, या सर्वांना या ठिकाणी घेऊन या. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेवींनाही बरोबर आणा (कारण त्यांना जमिनीत तुमच्याबरोबर वाटा नाही.) सर्वांनी मिळून तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंदात वेळ घालवा.
या गोष्टी तुमचा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच आणि त्याच्या समवेत खाव्या. आपली मुलेबाळे, दासदासी, वेशीच्या आतील लेवी यांना बरोबर घेऊन तिथे जाऊन त्या खा. जी कामं पार पाडली त्याबद्दल तुमचा देव परमेश्वर याच्या सान्निध्यात आनंद व्यक्त करा.
त्याला इतरांप्रमाणेच वाटा मिळेल. शिवाय आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात त्याचा वाटा असेलच.
सोबत पिशवी घेऊ नका, तुमच्या प्रवासासाठी फक्त तुमचे अंगावरचे कपडे असू द्या व पायातील वहाण असू द्या. अधिकचे वस्त्र किंवा वहाणा घेऊ नका. काठी घेऊ नका, कारण काम करणाऱ्याच्या गरजा भागणे आवश्यक आहे.
तो त्यांना म्हणाला, “ज्या कुठल्याही घरात तुम्ही जाल तेथे तुम्ही ते शहर सोडेपर्यंत राहा.
आणि ज्या घरात तुम्ही जाल त्या घरातच तुम्ही राहा. व दुसऱ्या गावाला जाताना ते घर सोडा.
तिचा व तिच्या घरामध्ये राहणाऱ्या सर्वांचा बाप्तिस्मा करण्यात आला. मग लुदियाच्या आम्हांला तिच्या घरी बोलाविले, ती म्हणाली, तुम्हाला जर खरोखरच वाटत असेल की मी प्रभु येशूमध्ये विश्वासणारी आहे, तर माझ्या घरी येऊन राहा. तिने आम्हांला तिच्या घरी राहावे म्हणून गळ घातली.
नंतर त्याने पौल व सीला यांना घरी नेले व अन्न खावयास दिले. सर्व लोक अतिशय आनंदित झाले होते. कारण ते आता देवावर विश्वास ठेवीत होते.
पण जेव्हा पौल व सीला तुरुंगाबाहेर आले, तेव्हा ते लीदीयाच्या घरी गेले. त्यांनी तेथे काही विश्वासणाऱ्यांना पाहिले, व त्यांना धीर दिला, मग पौल व सीला गेले.
मला खाण्याचा आणि पिण्याचा हक्क नाही काय?
ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.
मी तुमच्याकडून केवळ देणगीची अपेक्षा करतो असे नाही, उलट, तुमच्या हिशेबी अधिक फळवृद्धी व्हावी असे पाहतो.
आणखी, त्या आळशी, त्या आळशी बनतात व घरोघरी फिरतात. त्या आळशी बनतात एवढेच नाही तर इतर लोकांच्या भानगडीत स्वत:ला गुरफटून घेतात व इतरांविषयी खोटनाटे बोलतात. ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात.
जे वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या योग्यतेचे समजावे, विशेषत: जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना.
अति श्रम करणारा शेतकरी हा पहिल्या फळाचा वाटा घेणारा असावा.
माझ्या प्रिय मित्रा, आपल्या बंधूंच्या परक्यांच्या कल्याणासाठी जे काही करणे तुला शक्य आहे ते तू विश्वासूपणे करीतआहेस.