Home Bibles लूक 1:4 · मराठी बायबल
लूक 1:4 · मराठी बायबल

हे मी यासाठी लिहित आहे की, जे काही तुम्हांला शिकविण्यात आले ते खरे आहे, हे तुम्हांला समजावे.

Cross references

योहान 20:31

पण ही लिहिली यासाठी की, तुम्ही विश्वास ठेवावा की, येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने त्याच्या नावात तुम्हांला जीवन मिळेल.

प्रेषितांचीं कृत्यें 18:25

देवाच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आले होते. तो आत्म्यात आवेशी असल्यामुळे येशूविषयी अचूकतेने शिकवीत असे व बोलत असे, तरी त्याला फक्त योहानाचा बाप्तिस्माच ठाऊक होता.

रोमकरांस 2:18

त्या तुम्हांला त्याची इच्छा कळते आणि ज्या सर्वोत्तम गोष्टी आहेत, त्या तुम्ही स्वीकारता कारण नियमशास्त्राद्वारे तुम्हांला शिक्षण मिळाले आहे.

1 करिंथकरांस 14:19

परंतु सभेत इतरांनाही बोध करता यावा म्हणून इतर भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा माइया मनाप्रमाणे पाच शब्द सांगणे मी पसंत करतो.

गलतीकरांस 6:6

ज्याला कोणाला देवाच्या वचनांचे शिक्षण मिळाले आहे, त्याने जो शिक्षण देत आहे त्याला सर्व चांगल्या गोष्टीत वाटा द्यावा.

2 पेत्र 1:15

म्हणून याजीवनातून गेल्यानंतर या गोष्टींची आठवण करुन देण्यासाठी मी सर्व प्रंसगी प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.

Interlinear

Choose Theme