योसेफ नावाच्या मनुष्याशी ज्या कुमारीची मागणी झाली होती, तिच्याकडे गब्रीएलाला पाठविण्यात आले. योसेफ हा दाविदाच्याघराण्यातील होता. तिचे नाव मरीया होते.
Cross references
तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
तू विश्वासघातकी मुलगी होतीस. पण तू बदलशील. तू घरी येण्याआधी किती वेळ वाट बघशील?” “परमेश्वराने अघटित निर्माण केले आहे. स्त्रीला पुरुषाभोवती फिरु दिले.“
याकोब योसेफाचा पिता होता. योसेफ मरीयेचा पती होता. मरीया येशूची आई होती. येशूला ‘ख्रिस्त’म्हटले आहे.
येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव मरीया होते आणि येशू ख्रिस्ताचा जन्म अशाप्रकारे झाला. मरीयेचे योसेफशी लग्न ठरले होते. परंतु त्या अगोदरच ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने गर्भवती आहे असे दिसून आले.
पण असे विचार त्याच्या मनात घोळत असतानाच देवाच्या दूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले आणि सांगितले, “दाविदाच्या वंशातील योसेफा,मरीयेशी लग्न करण्यास अनमान करू नकोस कारण तिला होणारे मूल पवित्र आत्म्यापासूनहोणार आहे.
“कुमारी गर्भवती होईल, ती एका मुलाला जन्म देईल आणि ते त्याला ‘इम्मानुएल’ म्हणजे ‘आमच्याबरोबर देव आहे’ असे म्हणतील.”
मग योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ गावाहून यहूदीयातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला. कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.