Home Bibles लेवीय 8:12 · मराठी बायबल
लेवीय 8:12 · मराठी बायबल

मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करुन त्याला पवित्र केले.

Cross references

निर्गम 28:41

तुझा भाऊ अहरोन ह्याला व त्याच्या मुलांना ही वस्त्रे घाल, त्यांच्या डोक्यावर विशेष प्रकारचे तेल ओतून त्यांना आभिषेक करून त्यांना पवित्र कर म्हणजे मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील.

निर्गम 29:7

नंतर अभिषेकाचे तेल घेऊन ते अहरोनाच्या डोक्यावर ओतावे व त्याला अभिषेक करावा; यावरून अहरोनाला याजकाच्या सेवेसाठी निवडले आहे असे दिसून येईल.

निर्गम 30:30

“अहरोन व त्याच्या मुलांना तेलाचा अभिषेक कर म्हणजे ते पवित्र होतील. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील;

लेवीय 4:3

“जर अभिषेक झालेल्या याजकाने लोकावंर दोष येईल असे पाप केले तर आपल्या पापाबद्दल त्याने पापार्पण म्हणून कोणताही दोष नसलेला एक गोऱ्हा परमेश्वरासाठी अर्पावा.

लेवीय 7:36

परमेश्वराने ज्या दिवशी त्यांना अभिषेक केला त्या दिवशी त्याने इस्राएल लोकांकडून हा भाग त्यांना मिळावा अशी आज्ञा दिली म्हणून पिढ्यान्पिढ्या हा त्यांचा कायमचा हक्क ठरला आहे.

लेवीय 8:30

मग मोशेने अभिषेकाचे काही तेल व वेदीवरील काही रक्त घेऊन अहरोन व त्याची वस्त्रे, व त्याच्यासहित त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे ह्यांच्यावर शिंपडले आणि अहरोन व त्याची वस्त्रे व त्याच्याबरोबर त्याचे मुलगे व त्यांची वस्त्रे पवित्र केली.

लेवीय 10:7

पण तुम्ही दर्शनमंडपाच्याबाहेर जाऊ नये; जर बाहेर जाल तर मराल! कारण परमेश्वराच्या अभिषेकाच्या तेलाने तुमचा अभिषेक झाला आहे.” तेव्हा अहरोन, एलाजार व इथामार ह्यांनी मोशेची आज्ञा मानली.

लेवीय 21:10

“आपल्या भावांतून मुख्य याजक निवडला गेला, त्याच्या मस्तकावर अभिषेकाचे तेल ओतले गेले आणि पवित्र वस्त्रे परिधान करावयास त्याच्यावर संस्कार झाला; अशा रीतीने याजक ह्या नात्याने पवित्र सेवा करण्यासाठी त्याची निवड झाली आहे, म्हणून त्याने आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नयेत व लोकांच्यात शोकप्रदर्शनार्थ आपली वस्त्रे फाडू नयेत;

स्तोत्रसंहिता 133:2

ते गोड वास असलेल्या, याजकाच्या डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे, अहरोनाच्या दाढीतून ओघळणाऱ्या तेलासारखे, अहरोनाच्या खासकपड्यातून ओघळणाऱ्या तेलासारखे वाटते.

Interlinear

Choose Theme