Home Bibles लेवीय 5:11 · मराठी बायबल
लेवीय 5:11 · मराठी बायबल

“जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा त्याचे पापार्पण म्हणून आणावा; ते पापार्पण असल्यामुळे त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये.

Cross references

निर्गम 16:18

लोकांनी ते आपल्या कुटुंबातील प्रत्येकास दिले; ते मोजल्यानंतर प्रत्येकासाठी पुरेसे भरले; परंतु कमी अधिक गोळा केले असले तरी ते कधीही कमी किंवा जास्त नव्हते कारण प्रत्येक जण आपल्या स्वत:साठी व आपल्या घरातील सर्व माणसास पुरेल एवढे गोळा करी.

निर्गम 16:36

एक ओमर मान्ना म्हणजे त्यांचा मोजमापाप्रमाणे सुमारे आठवाट्या किंवा “एका एफाचा दहावाभाग” होता.

लेवीय 2:1

जेव्हा एखाद्याला परमेश्वरदेवासाठी अन्नार्पण करावयाची इच्छा असेल, तेव्हा त्याने मैदा आणावा; त्याने त्यात तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा;

लेवीय 2:4

“जेव्हा भट्टीत भाजलेले अन्नार्पण करावयाचे असेल, तर ते तेलात मळलेल्या मैद्याचे बेखमीर भाकरीचे वा वरुन तेल ओतलेल्या बेखमीर चपात्याचे असले पाहिजे.

लेवीय 2:15

त्यावर तेल ओत आणि धूप ठेव; हे धान्यार्पण होय.

लेवीय 5:6

आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून मेंढी आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.

लेवीय 5:9

पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय.

लेवीय 5:12

त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराकरिता होम करावा; हे पापार्पण होय.

लेवीय 12:8

मग याजकाने ते होले किंवा ती पिले परमेश्वरासमोर अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत.”

लेवीय 14:21

“परंतु तो माणूस गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसेल तर त्याने आपल्या प्रायश्चितासाठी ओवळणीचे एक कोंकरु दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेला, आठ वाट्या-एक दशांश एफा-मैदा आणि दोन तृतीय अंश पिंटभर-एक लोगभर-तेल आणावे;

लेवीय 27:8

“परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.

गणना 5:15

जर असे झाले, तर त्या माणसाने आपल्या बायकोला याजकाकडे घेऊन जावे. तसेच त्याने अर्पण म्हणून आठ वाट्या-एक दशांश एफा जवाचे पीठ घेऊन जावे; त्या पिठावर त्याने तेल ओतू नये किंवा धूप ठेवू नये; हे जवाचे पीठ म्हणजे परमेश्वराकरिता अन्नार्पण होय. हे द्वेषामुळे त्या माणसाने परमेश्वराला दिले आहे. आपली बायको आपल्याशी विश्वासू राहिली नाही असा त्याचा विश्वास आहे असे ह्या अन्नार्पणामुळे दिसेल.

गणना 15:4

“एखादा माणूस जेव्हा त्याची अर्पणे आणतो तेव्हा त्याने परमेश्वराला धान्यसुध्दा अर्पण केले पाहिजे. हे धान्यार्पण आठ कपसपीठ 1/4 हिंनभरतेलात मिसळून केलेले असले पाहिजे.

स्तोत्रसंहिता 22:1

माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस. तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.

स्तोत्रसंहिता 69:1

देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.

यशया 53:2

तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला. ओसाड जमिनीवर वाढणाऱ्या अंकुराप्रमाणे तो होता. त्याच्यात काही विशेष नव्हते. त्याला विशेष शोभा नव्हती. आपण त्याच्याकडे पाहिल्यावर तो आपल्याला आवडावा असे त्याच्यात काहीही वैशिष्ट्य नव्हते.

2 करिंथकरांस 5:21

ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.

Interlinear

Choose Theme