“एखाद्या अधिपतीने परमेश्वराने मना केलेले कर्म केले व चुकून पाप घडले तर तो दोषी ठरेल.
Cross references
तू लोकांमधून कर्तबगार देवाला भिणारे, व विश्वासू, पैसे खाऊन आपला निकाल बदलून अन्याय न करणारे असे लोक निवडून घे; त्यांना हजार लोकांवर, शंभर लोकावर, पन्नास लोकावर आणि दहा लोकांवर नायक म्हणून नेम.
“इस्राएल लोकांना असे सांग: जर कोणी परमेश्वराने मना केलेल्या कृत्यापैकी एखादे कृत्य केले वा चुकून त्याच्या हातून पाप घडले तर त्याने पुढील गोष्टी कराव्यात:
“इस्राएलच्या सर्व राष्ट्राकडून चुकून काही पाप घडले आणि ते मंडळीच्या लक्षात आले नाही, म्हणजे परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केले तर ते सर्वजण दोषी ठरतील.
“एखादा सामान्य माणूस परमेश्वराने मना केलेले एखादे कर्म केल्यामुळे चुकून पाप घडल्यामुळे दोषी ठरला;
“परमेश्वराने मना केलेली एखादी गोष्ट करुन कोणाकडून चुकून किंवा न कळत पाप घडले तर तो दोषी ठरेल; त्या पापाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.
“जर तुम्ही काही चूक केली आणि परमेश्वराने मोशेला दिलेल्या एखाद्या आज्ञेचे पालन करायला विसरलात तर तुम्ही काय कराल?
या चार माणसांनी इस्राएल मधून 250 माणसे एकत्र जमविली आणि ते मोशेविरुद्ध उठले. ते लोकांनी निवडलेले नेते होते, हे सर्व लोकांना माहीत होते.
नंतर मोशे, याजक एलाजार आणि लोकांचे पुढारी सैनिकांना भेटण्यासाठी छावणीबाहेर गेले.
दावीदाच्या या कारकिर्दीत एकदा दुष्काळ पडला. हा दुष्काळ तीन वर्षे टिकला. तेव्हा दावीदाने परमेश्वराची प्रार्थना केली. परमेश्वराने सांगितले, “शौल आणि त्याचे खुनी (रक्तपिपासू) घराणे यावेळच्या दुष्काळाला जबाबदार आहेत. शौलने गिबोन्यांना मारले म्हणून हा दुष्काळ पडला.”
हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.”
परमेश्वरा, जी पापे करायची इच्छा मला होते, ती मला करु देऊ नकोस. त्या पापांना माझ्यावर राज्य करु देऊ नकोस. तू जर मला मदत केलीस तर मी शुध्द होईनआणी माझ्या पापांपासून मुक्त होईन.