Home Bibles लेवीय 27:34 · मराठी बायबल
लेवीय 27:34 · मराठी बायबल

परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.

Cross references

लेवीय 26:46

हे विधी, नियम व निर्बध परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी दिले. हे नियम परमेश्वर व इस्राएल लोक ह्यांच्यामधील करार आहे. हे नियम परमेश्वराने सीनाय पर्वतापाशी मोशेला दिले ते हेच होत मोशेने हे नियम इस्राएल लोकांना सांगितले.

गणना 1:1

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,

गणना 3:1

परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्याकाळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ अशी:

गणना 28:6

(ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.)

गणना 36:13

परमेश्वराने यार्देन नदीजवळ मवाबमधील पलीकडे मोशेला दिलेल्या या आज्ञा आहेत.

अनुवाद 1:3

पण इस्राएलांनी मिसर सोडले आणि ते या जागी आले याला चाळीस वर्षे लागली. तेव्हा चाळीसाव्या वर्षाच्या अकराव्या महिन्यातील पहिल्या दिवशी मोशे इस्राएल लोकांशी हे बोलला. परमेश्वराने जे जे काही सांगायची आज्ञा केली होती; ते सर्व र्त्यंने सांगितले.

अनुवाद 4:5

“परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले.

योहान 1:17

मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली.

गलतीकरांस 4:24

या गोष्टी दृष्टांतरुप आहेत, त्या स्त्रिया दोन करार आहेत. एक करार सीनाय पर्वतावर झाला. आणि ज्यांच्या नशिबीगुलामगिरी होती अशा लोकांना त्याने जन्म दिला. हा करार हागारशी संबंध दर्शवितो.

इब्री लोकांस 12:18

ज्या पर्वताला हाताने स्पर्श करता येतो; जो अग्नीच्या ज्वालांनी पेटलेला आहे, जो अंधार, दु:ख व वादळ यांनी भरलेला आहे. अशा पर्वताकडे तुम्ही आला नाही. तर एका नविन ठिकाणी आला आहात.

Interlinear

Choose Theme