Home Bibles लेवीय 26:29 · मराठी बायबल
लेवीय 26:29 · मराठी बायबल

तुमच्या मुलांचे व मुलींचे मांस खाण्याची तुम्हावर पाळी येईल.

Cross references

अनुवाद 28:53

“तुम्हाला फार यातना भोगाव्या लागतील. शत्रू वेढा घालून तुमची रसद तोडेल. त्यामुळे तुमची उपासमार होईल. तुम्ही भुकेने व्याकुळ होऊन, तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्या पोटी घातलेल्या मुलाबाळांनाच तुम्ही खाल.

2 राजे 6:28

मग त्याने तिच्या समस्येविषयी विचारपूस केली. ती म्हणाली, “ही बाई मला म्हणाली, ‘तुझा मुलगा दे म्हणजे आज आपण त्याला मारुन खाऊ मग द्या आपण माझा मुलगा खाऊ.’

2 राजे 6:29

तेव्हा माझ्या मुलाला मारुन त्याचे मांस शिजवून आम्ही खाल्ले. दुसऱ्या दिवशी मी तिला म्हणाले, ‘आता तुझ्या मुलाला आण म्हणजे त्याला आपण खाऊ.’ पण तिने आपल्या मुलाला लपवून ठेवले आहे.”

यिर्मया 19:9

नगरीला शत्रूसैन्याचा वेढा पडेल. ते सैन्य नगरीची रसद तोडेल. मग नगरीतील लोकांची उपासमार सुरु होईल. लोकांना एवढी भूक लागेल की ते स्वत:च्याच मुलांना खातील आणि एकमेकांना खायला लागतील.’

विलापगीत 2:20

परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?

विलापगीत 4:10

त्या वेळी, प्रेमळ बायकांनीसुध्दा आपली मुले शिजविली ती मुलेच त्यांच्या आयांचे अन्न झाले. माझ्या लोकांचा नाश झाला. तेव्हा असे घडले.

यहेज्केल 5:10

यरुशलेममधील लोक उपासमारीने एवढे हैराण होतील की आईवडील मुलांना व मुले आईवडीलांना खातील. मी अनेक मार्गांनी तुम्हाला शिक्षा करीन. ज्यांना मी जिवंत ठेवलंय त्यांना मी सगळीकडे पसरवीन.”

मत्तय 24:19

त्याकाळी गर्भवती असलेल्या अगर तान्ही बालके असलेल्या स्रियांना फार कठीण जाईल.

लूक 23:29

कारण असे दिवस येत आहेत, जेव्हा लोक म्हणतील, “धन्य त्या स्त्रिया ज्या वांझ आहेत, आणि धन्य ती गर्भाशये, ज्यांनी जन्मदिले नाहीत, व धन्य ती स्तने, ज्यांनी कधी पाजले नाही.’

Interlinear

Choose Theme