Home Bibles लेवीय 26:24 · मराठी बायबल
लेवीय 26:24 · मराठी बायबल

तर मीही तुमच्याविरुद्ध होईन आणि मी, होय मी परमेश्वर तुमच्या पापाबद्दल तुम्हाला सातपट ताडण करीन.

Cross references

2 शमुवेल 22:27

परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि बदमाशांशी तूही कुटिलतेने वागतोस.

ईयोब 9:4

देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?

स्तोत्रसंहिता 18:26

परमेश्वर, जे लोक चांगले आणि शुध्द असतात त्यांच्याशी तू चांगला आणि शुध्द असतोस परंतु अगदी नीच आणि कुटिल असणान्यांना तू नामोहरण करतोस.

यशया 63:10

पण लोक परमेश्वराच्याविरूध्द उलटले. त्यांनी पवित्र आत्माला दु:ख दिले म्हणून परमेश्वर त्यांचा शत्रू झाला मग परमेश्वर त्यांच्याविरूध्द लढला.

Interlinear

Choose Theme