लेवीय 26:10 · मराठी बायबल
तुम्हाला मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हाला नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल! म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.
Cross references
लेवीय 25:22
मग आठव्या वर्षी तुम्ही पेराल तो पर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल, नवव्या वर्षाचे पीक हाती येईपर्यंत तुम्ही जुना साठा खात राहाल.
यहोशवा 5:11
वल्हांणाच्या दुसऱ्या दिवशी तेथे त्यांनी पिकलेल्या धान्याचा हुरडा खाल्ला. तसेच बेखमीर भाकर त्यांनी खाल्ली.
2 राजे 19:29
“मी तुझ्या साहाय्यासाठी येणार आहे याची खात्री पटावी म्हणून हे चिन्ह देतो. या वर्षी आपोआप धान्य उगवेल ते तुम्ही खाल. दुसऱ्या वर्षी त्याच्या बियाणातून उगवेल ते खाल. पण तिसऱ्या वर्षी मात्र तुम्ही स्वत: पेरणी कराल त्यातून धान्य काढा. द्राक्षाची लागवड करा आणि द्राक्षे खा.
लूक 12:17
तो स्वत:शी विचार करुन असे म्हणाला, “मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’