Home Bibles ☰ Books लेवीय 24:20 · मराठी बायबल
लेवीय 24:20 · मराठी बायबल

हाड मोडल्याबद्दल हाड मोडणे, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात; ह्याप्रमाणे एखाद्याने कोणा माणसाला जी इजा केली असेल त्याच प्रकारची इजा त्याला केली जावी.

Cross references

निर्गम 21:23

परंतु त्या बाईला जास्त इजा झाली असेल तर त्या माणसाला शिक्षा करावी; जर एखाढ्या माणसाला ठार मारण्यात आले असेल तर त्या कृत्याला जबाबदार असणाऱ्या माणसाला ठार मारावे. म्हणजे जिवाबद्दल जीव.

अनुवाद 19:21

तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? [22] तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.

शास्ते 1:7

तेव्हा तो राजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत सत्तर राजांच्या हातापयांचे अंगठे कापले आहेत. मी ताटाबाहेर टाकलेले अन्र त्यांना वेचून खावे लागत होते. त्या राजांबरोबर मी ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल परमेश्वराने मला परतफेड केली आहे.” यहूदाच्या लोकांनी मग त्या बेजेकच्या राजाला यरुशलेम येथे नेले. तेथेच तो मराण पावला.

मत्तय 5:38

“तुम्ही ऐकले आहे की असे सांगितले होते, ‘डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात.’

Interlinear

Choose Theme