Home Bibles ☰ Books लेवीय 23:28 · मराठी बायबल
लेवीय 23:28 · मराठी बायबल

त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल.

Cross references

लेवीय 16:30

कारण त्या दिवशी तुम्ही पापापासून शुद्ध व्हावे म्हणून याजक तुमच्यासाठी प्रायश्चित करील, मग परमेश्वरासमोर तुम्ही पापापासून शुद्ध ठराल.

लेवीय 16:33

त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.

लेवीय 16:34

इस्राएल लोकांसाठी त्यांच्या पापाबद्दल वर्षातून एकदा प्रायश्चित करण्याकरिता हा कायमचा विधीनियम होय.”परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ते सर्व केले.

यशया 53:10

परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील.

दानीएल 9:24

दानीएला, देवाने तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या पवित्र नगरीसाठी 70 आठवडे दिले आहेत. हे 70 आठवडे, वाईट गोष्टी व पाप करावयाचे सोडून द्यावे, लोकांना पवित्र करावे कायम राहाणारा चांगुलपणा आणावा,दुष्टान्त व संदेष्टे यांच्यावर शिक्कामोर्तब करावे, आणी पवित्र स्थान देवासाठी अर्पण केले जावे म्हणून दिले आहेत.

जखऱ्या 3:9

पाहा! मी यहोशवापुढे विशेष दगड ठेवतो. त्याला सात बाजूआहेत. मी त्यावर खास संदेश कोरीन. तो संदेश, मी एका दिवसात पृथ्वीवरीलसर्व पाप नाहीसे करीत असल्याचे दाखवील.”

रोमकरांस 5:10

आम्ही देवाचे शत्रू असताही त्याच्या पुत्राच्या मरणाद्वारे त्याने आमच्याशी समेट केला. त्यामुळे आता आम्ही देवाचे मित्र असल्यामुळे देव आम्हांला त्याच्या पुत्राच्या जीवनाद्वारे रक्षील.

इब्री लोकांस 9:12

बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वत:चेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वत:च एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.

इब्री लोकांस 9:26

तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वत:चे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वत:ला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे.

इब्री लोकांस 10:10

देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या देहाच्या एकदाच झालेल्या अर्पणाद्वारे आपण शुद्ध करण्यात आलो.

इब्री लोकांस 10:14

कारण अनंतकाळच्या त्याने केलेल्या एका यज्ञाच्या द्वारे त्याने ज्यांना शुद्ध केले, त्यांना परिपूर्ण केले.

1 योहान 2:2

तोअर्पण आहे जो आमचे पाप आमच्यापासून काढून घेतो आणि केवळ आमचेच पाप नव्हे तर सगळ्या जगाचे पाप काढून घेतो.

1 योहान 4:10

आम्ही देवावर प्रीति केली असे नाही तर त्याने आम्हांवर प्रीति केली व आपल्याएकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्र्च्त्ति म्हणून पाठविले; यामध्ये खरी प्रीति आहे.

1 योहान 5:6

येशू ख्रिस्त आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला. तो केवळ पाण्याद्वारेच आमच्याकडे आला असे नाही तर पाणी आणिरक्ताद्वारे आला, व आत्मा ही साक्ष देतो, कारण आत्मा सत्य आहे.

Interlinear

Choose Theme