Home Bibles लेवीय 22:9 · मराठी बायबल
लेवीय 22:9 · मराठी बायबल

“त्यांनी माझी आज्ञा पाळावी व पवित्र पदार्थ अपवित्र होणार नाहीत याची काळजी घ्यावी; तो ते घेतील तर आज्ञाभंगाच्या पापामुळे ते मरणार नाहीत. मी परमेश्वराने त्यांना ह्या पवित्र कामासाठी वेगळे केले आहे.

Cross references

निर्गम 28:43

आणि अहरोन व त्याचे मुलगे ज्या ज्या वेळी दर्शनमंडपात पवित्रस्थानापुढे याजक म्हणून सेवा करण्यास जातील त्या त्या वेळी त्यांनी हे चोळणे घातलेच पाहिजेत; तसे न केल्यास, दोषी ठरुन ते मरतील; अहरोनाला व त्याच्यानंतर त्याच्या वंशाला हा कायमचा नियम आहे.”

लेवीय 10:1

मग अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपआपली धुपाटणी घेतली व त्यात वेगळ्या अग्नीने धूप पेटवला; परंतु मोशेने आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी अग्नीचा उपयोग न करता वेगव्व्याच अग्नीचा उपयोग केला;

लेवीय 16:2

तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!

लेवीय 22:16

जर याजकांनी त्यांना पवित्र अर्पणे खाण्याची परवानगी दिली तर ते स्वत:वर अपराध ओढवून घेतील. आणि त्या अपराधाबद्दल त्यांना पैसे भरावे लागतील. मी परमेश्वर त्यांना पवित्र करणारा आहे!”

गणना 18:22

परंतु इस्राएलच्या इतर लोकांनी कधीनी दर्शन मंडपाजवळ जाता कामा नये. ते जर गेले तर त्यांना मारून टाकण्यात यावे.

गणना 18:32

आणि जर तुम्ही सर्वांत चांगला दहावा भाग परमेश्वराला द्याल तर तुम्ही कधीही अपराधी होणार नाही. तुम्हाला हे नेहमी आठवेल की त्या भेटी म्हणजे इस्राएल लोकांकडून पवित्र अर्पणे होत आणि तुम्ही मरणार नाही.”

Interlinear

Choose Theme