“तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये.
Cross references
तर आता आपणाला मुले होण्याकरिता आपण आपल्या वडिलांचा उपयोग करु, तेव्हा आपण आपल्या वडिलाकडे जाऊन त्यांना भरपूर द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्यापाशी निजू म्हणजे मग त्यामुळे आपला वंश चालू राहील.”
तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाचीलाज जाईल.
जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.
“कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये!
ह्या नगरीत, ते वडिलांच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतात. रजस्वला स्त्रीवरही ते बलात्कार करतात.