Home Bibles लेवीय 16:31 · मराठी बायबल
लेवीय 16:31 · मराठी बायबल

तुमच्यासाठी हा फार महत्वाचा व पूर्ण विसाव्याचा शब्बाथ दिवस आहे; तुम्ही अन्न न घेता आपल्या जिवास दंडन करावे. तुम्ही नम्र व्हावे; हा कायमचा विधी नियम होय.

Cross references

निर्गम 31:15

काम करण्याकरता आठवड्याचे इतर सहा दिवस आहेत; परंतु सातवा दिवस विसावा घेण्यासाठी पवित्र दिवस आहे हा परमेश्वराला मान देण्याचा पवित्र दिवस आहे; जर कोणी शब्बाथ दिवशी काम करील तर त्याला अवश्य ठार मारावे.

निर्गम 35:2

“कामकाजासाठी सहा दिवस आहेत परंतु सातवा दिवस विसाव्यासाठी पवित्र दिवस आहे, तो पाळून विसावा घेतल्यामुळे तुम्ही परमेश्वराचा सन्मान कराल. सातव्या दिवशी-शब्बाथ दिवशी काम करणाऱ्या कोणत्याही माणसास अवश्य जिवे मारावे.

लेवीय 23:32

तो दिवस तुम्हाला पवित्र विसाव्याचा शब्बाथ दिवस व्हावा; त्या दिवशी तुम्ही काही न खाता आपल्या जिवास दंडन करावे व नम्र व्हावे; त्या महिन्याच्या नवव्या दिवसाच्या संध्याकाळापासून सुरवात करुन दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुम्ही हा विसाव्याचा दिवस पाळावा.”

लेवीय 25:4

पण सातव्या वर्षी देशाला विसावा द्यावा म्हणजे परमेश्वराकरिता हा पवित्र शब्बाथाचा विसावा असावा, त्यावर्षी शेते पेरु नयेत आणि द्राक्षमळयाची छाटणी करु नये.

यशया 58:3

आता ते लोक म्हणतात, “तुझ्याबद्दल आदर दाखविण्यासाठी आम्ही उपास करतो. तू आमच्याकडे का पाहत नाहीस? तुझा न राखण्यासाठी आम्ही आमच्या शरीरांना क्लेश करून घेतो. तू आमची दखल का घेत नाहीस?”पण परमेश्वर म्हणतो, “विशेष दिवशी उपास करून तुम्ही तुम्हालाच पाहिजे ते करता. तुम्ही तुमच्या शरीराला क्लेश देत नाही तर तुमच्या नोकरांना शिक्षा करता.

यशया 58:5

त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का?

Interlinear

Choose Theme