Home Bibles विलापगीत 5:15 · मराठी बायबल
विलापगीत 5:15 · मराठी बायबल

आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही.

Cross references

ईयोब 30:31

माझे वाद्य दु:खी गाणे गाण्यासाठीच लावले गेले आहे. माझ्या बासरीतून रडण्याचेच सूर उमटत आहेत.

स्तोत्रसंहिता 30:11

मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडाळलेस.

यिर्मया 25:10

त्या ठिकाणच्या सुखाच्या व आनंदाच्या कल्लोळांचा मी शेवट करीन. तेथे नव वर वधूंचा सुखाचा शब्द उमटणार नाही, जात्यांचा आवाज येणार नाही आणि दिव्यातला प्रकाश नाहीसा होईल.

आमोस 6:4

पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता.

आमोस 8:10

मी तुमचे उत्सव शोकदिनांत बदलीन. तुमची सर्व गाणी ही मृतांसाठीची शोकागीते होतील. मी प्रत्येकाला शोकप्रदर्शक कपडे घालीन. मी प्रत्येक डोक्याचे मुंडन करीन. एकुलता एक मुलगा गेल्यावर जसा आकांत होतो, तसा मी करीन. तो फारच कडू शेवट असेल.”

याकोब 4:9

दु:खी व्हा, शोक करा, आणि रडा! तुमचे हसणे दु:खात बदलो. तुमच्या आनंदाचे खेदात रूपांतर होवो.

Interlinear

Choose Theme