परमेश्वरा, आमचे काय झाले ते लक्षात ठेव. आमच्या अप्रतिष्ठेकडे नजर टाक.
Cross references
हनानी आणि त्याच्या बरोबरचे लोक म्हणाले, “नहेम्या, बंदिवासातून सुटून यहुदात राहणारे हे लोक मोठ्या बिकट परिस्थितीत आहेत. त्यांच्यापुढे बऱ्याच अडचणी असून त्यांची अप्रतिष्ठा चालली आहे. कारण यरुशलेमची तटबंदी कोसळून पडली आहे. तसेच तिच्या वेशी जळून खाक झाल्या आहेत.”
आपला सेवक मोशे याला दिलेली शिकवण तू कृपया आठव. त्याला तू म्हणाला होतास, “तुम्ही इस्राएल लोक एकनिष्ठ राहिला नाहीत तर दुसऱ्या राष्टांमध्ये मी तुम्हाला विखरुन टाकीन.
नहेम्याने देवाची प्रार्थना केली. तो म्हणाला, “आमच्या देवा, आमची प्रार्थना ऐक. हे लोक आमचा तिरस्कार करतात. सनबल्लट आणि तोबीया आमचा अपमान करत आहेत. त्या वाईट गोष्टी त्यांच्यावरच उलटव. त्यांना लाजिरवाणे कर. त्यांना निर्वासित अवस्थेत कैदी कर.
देवा, माझे आयुष्य म्हणजे केवळ श्र्वास आहे हे आठव. मी पुन्हा कधीही काही चांगले पाहणार नाही.
देवा, जरा आठव तू मला मातीसारखे बनवलेस. आता तूच परत माझी माती करणार आहेस का?
तू शेजाऱ्यांमध्ये आमचे हसे केलेस. आमचे शेजारी आम्हाला हसतात. ते आमची मस्करी करतात.
देवा, आणखी किती काळ शत्रू आमची चेष्टा करणार आहेत? तू त्यांना कायमचीच तुझ्या नावाचा अनादर करायची परवानगी देणार आहेस का?
देवा, या गोष्टींची आठवण ठेव. शत्रूंनी तुझा प्राण उतारा केला ते लक्षात असू दे. ती मूर्ख माणसे तुझ्या नावाचा तिरस्कार करतात.
आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
देवा, आमच्या भोवतालच्या माणसांनी आम्हांला जो त्रास दिला त्याबद्दल त्यांना सात वेळा शिक्षा दे. तुझा अपमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा कर.
प्रभु, तुमच्या सेवकाचा लोकांनी कसा अपमान केला होता ते लक्षात ठेवा. परमेश्वरा, तुझ्या शत्रूंनी केलेल्या सर्व अपमानांना मला तोंड द्यावे लागले. त्या लोकांनी तू निवडलेल्या राजाचा अपमान केला.
त्याच प्रमाणे आपण परमेश्वरावर, आपल्या देवावर अवलंबून असतो. आपल्यावर दया करावी म्हणून आपण देवाची वाट बघतो.
परमेश्वरा, तू मला जाणतोस माझी आठवण ठेव व माझी काळजी घे. लोक मला दुखवत आहेत त्यांना योग्य ती शिक्षा कर. त्या लोकांशी तू संयमाने वागतोस. पण त्यांना संयम दाखविताना, माझा, मी तुझ्यासाठी भोगत असलेल्या दु:खाचा परमेश्वरा विचार कर.
“आम्ही, यहूदाचे लोक लज्जित झालो आहोत. आमचा अपमान झाला आहे. का? कारण परके परमेश्वराच्या मंदिरातील पवित्र ठिकाणी गेले आहेत.”
यरुशलेमची वस्त्रे मळीन झाली. तिच्यावर बितणाऱ्या गोष्टींची तिला कल्पना नव्हती. तिचे पतन विस्मयकारक होते. तिचे सांत्वन करणारे कोणीही नव्हते. “हे परमेश्वरा” ती म्हणते, “माझी दशा काय झाली आहे पाहा! माझा शत्रू त्याच्या मोठेपणाचा कसा तोरा मिळवितो आहे ते पाहा!”
यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!
“परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी दु:खी झाले आहे. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे माझ्या मनात खळबळ उडाली आहे. असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर माझी मुले तलवारीने मारण्यात आली. तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.
रस्त्यावरून जाणारे तुला पाहून हादरतात व हळहळतात. यरुशलेमच्या कन्येकडे बघून ते चुकचुकतात. ते विचारतात, “लोक जिला “सौंदर्यपूर्ण नगरी” अथवा “पृथ्वीवरचा आनंद म्हणतात, ती नगरी हीच का?””
परमेश्वरा, माझ्याकडे बघ! तू अशा रीतीने जिला वागविलेस ती कोण आहे ते तरी पाहा! मला तुला एक प्रश्न विचारू दे: स्त्रियांनी पोटच्या मुलांना, खावे काय? ज्या मुलांची त्यांनी काळजी काळजी घेतली त्यांना स्त्रियांनी खावे काय? परमेश्वराच्या मंदिरात धर्मगुरु व संदेष्टे मारले जावेत का?
परमेश्वरा, लक्षात ठेव. मी फार दु:खी आहे, व मला घर नाही. तू दिलेल्या कडू विषाचे (शिक्षेचे) स्मरण कर.
त्या शत्रूंनी केलेला माझा अपमान आणि माझ्याविरुध्द आखलेले बेत तू. परमेश्वरा, ऐकले आहेस.
परमेश्वरा, मी तुझी वार्ता ऐकली. परमेश्वर तू भूतकाळात केलेल्या सामर्थ्यशाली गोष्टीने मी विस्मयचकित झालो आहे. आता, आमच्या काळातही तू अशाच मोठ्या गोष्टी घडवाव्यास म्हणून मी प्रार्थना करतो. कृपया आमच्या आयुष्यातच त्या घडव. पण तुझ्या खळबळजनक घटनांच्या वेळीही, आमच्यावर दया करण्यास विसरु नकोस.
नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्याधिकाराने येशील तेव्हा माझी आठवण कर.”