Home Bibles विलापगीत 3:43 · मराठी बायबल
विलापगीत 3:43 · मराठी बायबल

तू क्रोधाविष्ट झालास आमचा पाठलाग केलास आणि दया न दाखविता आम्हाला ठार केलेस.

Cross references

2 इतिहास 36:16

पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.

स्तोत्रसंहिता 44:19

परंतु देवा, तू आम्हाला कोल्हे राहातात त्या जागेत चिरडलेस, मृत्यूसारख्या अंधाऱ्याजागेत तू आम्हाला झाकलेस.

स्तोत्रसंहिता 80:5

तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस. तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.

स्तोत्रसंहिता 83:15

देवा, वादळात धूळ जशी उडून जाते, तसे तू त्या लोकांचा पाठलाग करुन त्यांना उडवून लाव. त्यांना गदगदा हलव आणि तुफानात उडवून दे.

विलापगीत 2:1

परमेश्वराने सियोनकन्येला कसे अभ्राच्छादित केले आहे पाहा! त्याने इस्राएलचे वौभन धुळीला मिळविले .कोपाच्या दिवशी, इस्राएल आपले पायाखालचे आसन आहे. ह्याची परमेश्वराने आठवण ठेवली नाही.

विलापगीत 2:17

देवाने ठरविल्याप्रमाणे केले. तो जे करीन म्हणाला होता, तसेच त्याने केले. फार पूर्वी त्याने जी आज्ञा केली होती. ती त्याने पूर्ण केली. त्याने नाश केला व त्याला दया आली नाही. तुझ्याबाबतीत जे घडले, ते पाहून तुझ्या शत्रूंना आनंद झाला. हा आनंद त्यांना देवाने मिळवून दिला. देवाने तुझ्या शत्रूंना सामर्थ्यशाली बनविले.

विलापगीत 2:21

नगरीच्या रस्त्यांवर तरुण तरुणी आणि वृध्द पडले आहेत. माझ्या तरुण तलवारीने मृत्यू पावल्या आहेत. परमेश्वरा, तू कोपलास त्या दिवशी, अजिबात दया न दाखविता तू त्यांना मारलेस!

विलापगीत 3:8

मी जेव्हा मदतीसाठी आक्रोश करतो, तेव्हासुध्दा परमेश्वर माझा धावा ऐकत नाही.

विलापगीत 3:66

क्रोधाने त्यांचा पाठलाग कर व त्यांचा नाश कर. ह्या आकाशाखाली, परमेश्वरा, त्यांचा नाश कर.

यहेज्केल 7:9

मी तुम्हाला अजिबात दया दाखविणार नाही. मला तुमच्याबद्दल वाईट वाटणार नाही. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी तुम्हाला शिक्षा करत आहे. तुम्ही फारच भयानक कृत्ये केली. आता तुम्हाला कळेल की तुम्हाला दणका देणारा मी तुमचा परमेश्वर आहे.

यहेज्केल 8:18

मी माझा राग त्यांच्यापाशी प्रकट करीन. मी त्यांना अजिबात दया दाखविणार नाही. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटणार नाही. ते मला हाका मारतील पण मी त्यांचे मुळीच ऐकणार नाही.”

यहेज्केल 9:10

मी अजिबात दया दाखविणार नाही. त्या लोकांबद्दल मला वाईट वाटणार नाही. त्यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले आहे. मी फक्त त्यांना योग्य अशी शिक्षा देत आहे.

Interlinear

Choose Theme