Home Bibles विलापगीत 3:4 · मराठी बायबल
विलापगीत 3:4 · मराठी बायबल

त्यांने माझी त्वचा आणि मांस नष्ट केले आणि माझी हाडे मोडली.

Cross references

ईयोब 16:8

तू मला खूप बारीक व अशक्त केले आहे म्हणून मी अपराधी आहे असे लोकांना वाटते.

ईयोब 30:30

माझी कातडी काळी पडली आहे आणि शरीर तापाने फणफणले आहे.

स्तोत्रसंहिता 22:14

माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या पाण्यासारखी नाहीशी झाली आहे, माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.

स्तोत्रसंहिता 31:9

परमेश्वरा, माझ्यावर खूप संकटे आली आहेत. म्हणून माझ्यावर दया कर. मी इतका दुखी कष्टी झालो आहे की माझे डोळे क्षीण झाले आहे माझ्या पोटासह माझे आंतले अवयव दुखत आहेत.

स्तोत्रसंहिता 32:3

देवा, मी पुन्हा पुन्हा तुझी प्रार्थना केली परंतु माझ्या गुप्त अपराधांची वाच्यता केली नाही प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी मी क्षीण होत गेलो.

स्तोत्रसंहिता 38:2

परमेश्वरा, तू मला इजा केलीस तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.

स्तोत्रसंहिता 51:8

मला सुखी कर, पुन्हा आनंदी कसे व्हायचे ते मला सांग. तू जी हाडे चिरडून टाकलीस ती पुन्हा आनंदी होऊ दे.

स्तोत्रसंहिता 102:3

माझे आयुष्य धुराप्रमाणे निघून जात आहे. हळू हळू विझत चाललेल्या आगीप्रमाणे माझे आयुष्य आहे.

यशया 38:13

सबंध रात्रभर मी सिंहगर्जनेप्रमाणे मोठमोठयाने रडलो. सिंहाने हाडेसुध्दा खाऊन नष्ट करावीत तशा माझ्या आशा नष्ट झाल्या. तू माझे आयुष्य फार लवकर संपविलेस.

यिर्मया 50:17

“सर्व देशभर पसरलेल्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे इस्राएल आहे. सिंहाने पाठलाग करुन दूर पळवून लावलेल्या मेंढराप्रमाणे इस्राएल आहे. त्यांच्यावर प्रथम हल्ला करणारा सिंह म्हणजे अश्शूरचा राजा आणि त्याची हाडे मोडणारा अखेरच सिंह म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होय.”

Interlinear

Choose Theme