Home Bibles शास्ते 9:33 · मराठी बायबल
शास्ते 9:33 · मराठी बायबल

सकाळी सूर्य वर येताच शहरावर हल्ला चढवा. गाल आणि त्याची माणसे तुझा प्रतिकार करायला येतील तेव्हा त्यांचा चांगला समाचार घ्या.

Cross references

लेवीय 25:26

आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या माणसाला आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.

1 शमुवेल 10:7

असे झाले की तुला जे हवे ते तू साध्य करु शकशील. कारण परमेश्वराचीच तुला साथ असेल.

1 शमुवेल 25:8

तू त्यांनाही विचार तेही हेच सांगतील. मी पाठवलेल्या या तरुणांवर लोभ असू दे. तुझ्या या भरभराटीच्या काळात आम्ही तुझ्याकडे आलो आहोत. तेव्हा या तरुणांना तू तथाशक्ती काही तरी द्यावेस. माझ्यासाठी, तुझा या मित्र दावीदासाठी म्हणून एवढे कर.”

उपदेशक 9:10

प्रत्येक वेळी जे काम असेल ते उत्तम प्रकारे करा. कबरेत काम नसते. तिथे विचार नसतात. ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.

Interlinear

Choose Theme