Home Bibles शास्ते 9:17 · मराठी बायबल
शास्ते 9:17 · मराठी बायबल

पण माझ्या वडीलांनी तुमच्यासाठी काय केले ते आठवा ते तुमच्यासाठी झुंजले. मिद्यानापासून तुमचे रक्षण करताना त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात घातला.

Cross references

शास्ते 7:1

यरूब्बाल (म्हणजेच गिदोन) आणि त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांनी सकाळी लवकर उठून हरोद झऱ्याजवळ तळ दिला. आणि मिद्यानी लोकांचा तळ मोरे नावाच्या डोंगराच्या पायथ्याजवळ एका खोऱ्यात होता. हे ठिकाण गिदोनच्या तळाच्या उत्तरेस होते.

शास्ते 8:4

मग गिदोन आपल्या तीनशे माणसांसह यार्देन नदी उतरुन पलीकडे गेला. पाठलाग करताना ते सर्व थकलेले आणि भुकेलेले होते.

शास्ते 12:3

तुमची मदत मिळण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा मी माझा जीव धोक्यात घातला. नदी उतरुन मी अम्मोन्यांशी लढायला गेलो. त्यांना नेस्तनाबूत करण्यात परमेश्वराचे मला साहाय्य झाले. आता तुम्ही आज माझ्याशी लढायला का आला आहात?”

रोमकरांस 5:8

परंतु आम्ही पापी असतानाच ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. त्याद्वारे त्याने दाखवून दिले की, तो आमच्यावर फार प्रेम करतो.

रोमकरांस 16:4

ज्यांनी माझ्यासाठी आपले जीव धोक्यात घातले होते. त्यांचे केवळ मीच आभार मानतो असे नाही, तर विदेशात स्थापन झालेल्या मंडळयाही आभार मानतात.

प्रकटीकरण 12:11

आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला.त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही,

Interlinear

Choose Theme