एफ्राईम लोकांनी दोन मिद्यानी नेत्यांना पकडले, ओरेब आणि जेब हे दोन नेते होत. ओरेबचा खडक या ठिकाणापाशी त्यांनी ओरेबला मारले. जेबला जेबचे द्राक्षकुंड येथे मारले. एफ्राईम लोकांनी मिद्यान्याचा पाठलाग सुरुच ठेवला. ओरेब आणि जेब यांची मुंडकी त्यांनी गिदोनला दाखवायला नेली. यार्देन नदीपलीकडे गिदोन होता.
Cross references
त्यानंतर आखानाच्या जळून गेलेल्या शरीरावर त्यांनी दगडांची रास रचली. हे दगड आज ही तेथे आहेत. अशा तऱ्हेने परमेश्वराने आखानावर आपत्ती आणली म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव आखोर ची दरी असे पडले. यानतर परमेश्वराचा कोप झाला नाही.
याही वर्षी तुम्ही चांगले पीक घेतले आहे. ओरेब जेब या दोन मिद्यानी नेत्यांना तर परमेश्वराने तुमच्या हाती सोपवले. तुम्ही जे केलेत त्याच्याशी मी माझ्या यशाची तुलना कशी करु?” गिदोनचे हे उत्तर ऐकून एफ्राईम लोकांचा राग बराच निवळला.
तू त्यांचा एन - दोर येथे पराभव केलास आणि त्यांची प्रेते जमिनीवर कुजली आणि त्यांचे खत बनले.
देवा, शत्रूच्या प्रमुखाचा पराभव कर. तू ओरेब व जेब यांचे जे केलेस तेच त्यांचेही कर जेबह व सलमुन्ना यांचे जे केलेस तसेच त्यांचे ही कर.
देवा, ते लोक आम्हाला जबरदस्तीने तुझ्या वस्तीवरुन जायला सांगत होते म्हणजे त्यांना तिचा ताबा घेता येईल.
पूर्वी सर्वशक्तिमान परमेश्वराने मिद्यानला ओरेबाच्या खडकाजवळ हरविले होते, त्याप्रमाणेच परमेश्वर अश्शूरवर हल्ला करून त्याला चाबकाने फोडून काढील. पूर्वी परमेश्वराने मिसरला शिक्षा करताना, आपल्या हातातील दंडाने समुद्र दुभंगून आपल्या लोकांना समुद्रपार केले व मिसरच्या लोकांना बुडविले. अशाच तऱ्हेने परमेश्वर अश्शूरपासून आपल्या लोकांना