Home Bibles शास्ते 6:4 · मराठी बायबल
शास्ते 6:4 · मराठी बायबल

ते या प्रदेशात तळ देत आणि इस्राएल लोकांनी पेरलेल्या पिकांचा नाश करत. थेट गज्जा पर्यंतच्या जमिनीतील उत्पन्नाची वाट लावली. त्यामुळे इस्राएल लोकांसाठी काहीच शिल्लक राहिले नाही. शेव्व्यामेंढ्या, गुरेढोरे, गाढवे देखील त्यांना राहिली नाहीत.

Cross references

उत्पत्ति 10:19

कनान्यांची सीमा उत्तरे कडील सीदोनापासून दक्षिणेकडील गरारापर्यंत व पश्चिमेकडील गाजापासून तर पूर्वेस सदोम व गमोरा पर्यंत तसेच आदमा पासून व सबोईम पासून व लेशापर्यंत पसरली होती.

उत्पत्ति 13:10

लोटाने यार्देन दरीकडे नजर टाकली तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी असल्याचे त्याला दिसले (परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश केला त्याच्या आधीची ही घटना आहे. त्यावेळी थेट सोअरापर्यंत पसरलेले यार्देन नदीचे खोरे परमेश्वराच्या बागे सारखे सुंदर होते मिसर मधील प्रदेशाप्रमाणे ही भूमी चांगली होती.)

लेवीय 26:16

तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हाला पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हाला यश मिळणार नाही-तुम्हाला पीक मिळणार नाही-आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.

अनुवाद 28:30

“तुमचे जिच्याशी लग्न ठरले आहे, तिचा उपभोग दुसरा कोणी घेईल. तुम्ही घर बांधाल पण त्यात राहणार नाही. द्राक्षमळा लावाल पण त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही.

अनुवाद 28:31

लोक तुमच्यादेखत तुमच्या गायी कापतील पण त्याचे मांस तुम्हाला खायला मिळणार नाही. तुमची गाढवे लोक पळवून नेतील आणि परत करणार नाही. तुमच्या शेळ्या मेंढ्या शत्रूच्या हाती जातील आणि तुम्हाला कोणी सोडवणारा नाही.

अनुवाद 28:33

“तुमच्या जमिनीचे उत्पन्न आणि तुमच्या साऱ्या श्रमाचे फळ एखादे अपरिचित राष्ट्र बळकावेल. लोक तुमची उपेक्षा करतील.

अनुवाद 28:51

तुमची जनावरे आणि तुम्ही काढलेले पीक ते नेतील. तुम्ही नष्ट होईपर्यंत ते तुमची लूट करतील. धान्य, द्राक्षारस, तेल, गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या काही म्हणता काही तुम्हाला उरणार नाही.

नीतिसूत्रे 28:3

राजाने जर गरीब लोकांवर संकटे आणली तर तो पीक उद्ध्वस्त करणाऱ्या जोरदार पावसासारखा असतो.

यिर्मया 5:17

तुम्ही गोळा केलेले सर्व धान्य ते खातील. ते तुमचे सर्व अन्न खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील. ते तुमच्या मुलामुलींना खाऊन टाकतील (त्यांचा नाश करतील) ते तुमची गुरे, शोळ्या, मेंढ्या खातील. ते तुमची द्राक्षे आणि अंजिरे फस्त करतील. त्यांच्या तलवारीच्या जोरावर ते तुमच्या मजबूत शहरांचा नाश करतील. तुम्ही ज्या शहरांवर विसंबता ती भक्क म शहरे ते नष्ट करतील.”

यिर्मया 49:9

“मजूर द्राक्षमळ्यातून द्राक्षे तोडतात पण ते काही द्राक्षे झाडावरच ठेवतात. चोरसुद्धा सर्व नेत नाही.

ओबद्या 1:5

तुझा खरोखरीच नाश होईल. तुझ्याकडे चोर येतील. रात्री लुटारु येतील, ते चोर त्यांना पाहिजे ते सर्व नेतील. तुझ्या मळ्यातील द्राक्षे तोडताना मजूर काही द्राक्षे मागे ठेवतात.

मीखा 6:15

तुम्ही बी पेराल. पण तुम्हाला धान्य मिळणार नाही. जैतुनांपासून तेल काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, पण तुम्हाला तेल मिळणार नाही. तुम्ही द्राक्षांचा चुराडा कराल पण तुम्हाला पुरेसा रस पिण्यास मिळणार नाही.

Interlinear

Choose Theme