मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली. कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली. सीसरावर तिचा प्रयोग केला. त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.
Cross references
मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
थैलीतून एक दगड काढून गोफणीत घातला आणि गोफण फिरवली. त्याबरोबर गल्याथच्या दोन डोळ्यांच्या बरोबर मध्यभागी त्या दगडाचा नेम लागला. कपाळात दगड घुसला आणि गल्याथ जमिनीवर पालथा पडला.
मग तिने गावातील लोकांना शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांना शबाचे मुंडके धडावेगळे करुन ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले.यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरुशलेम येथे राजाकडे आला.