Home Bibles शास्ते 3:31 · मराठी बायबल
शास्ते 3:31 · मराठी बायबल

एहूदनंतर आणखी एक जण इस्राएल लोकांच्या रक्षणाला आला तो म्हणजे अनाथचा मुलगा शमगार त्याने बैलाच्या आरीने पलिष्ट्यांपैकी सहाशे जणांना मारले.

Cross references

शास्ते 2:16

तेव्हा परमेश्वराने न्यायाधीश म्हणून, ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांची नेमणूक केली. हे नेते इस्राएलांचा ताबा घेणाऱ्या शत्रुंपासून त्यांची सुटका करीत.

शास्ते 4:1

एहूदच्या मृत्यूनंतर पुन्हा लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने निंद्य वर्तन करायला सुरुवात केली.

शास्ते 4:3

सीसराकडे नऊशे लोखंडी रथ होते. त्याच्या जुलमी राजवटीत इस्राएल लोक वीस वर्षे होते. तेव्हा त्यांनी परमेश्वराकडे मदतीची याचना केली.

शास्ते 5:6

अनाथचा मुलगा शमगार याच्या आणि याएलच्या कारकिर्दीत राजमार्ग ओस पडले वाटसरुंचे तांडे आडवाटेने जाऊ लागले.

शास्ते 5:8

नगराच्या वेशीपाशी युध्द करायला परमेश्वराने नवे नेते निवडले.तेव्हा चाळीस हजार इस्राएल लोकांत कोणाकडेही भाला किंवा ढाल नव्हती.

शास्ते 10:7

तेव्हा परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. त्याने अम्मोनी आणि पलिष्टी या लोकांच्या हातून त्यांचा पराभव करवला.

शास्ते 10:11

परमेश्वर इस्राएल लोकांना म्हणाला, “मिसरी, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी अशा वेगवेगव्व्या लोकांकडून जेव्हा जेव्हा तुम्हाला जाच झाला तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणे आणलेत. मी तुमची सुटका करत गेलो.

शास्ते 10:17

अम्मोनी लोक युध्दासाठी एकत्र जमले. गिलाद प्रदेशात त्यांची छावणी होती. इस्राएल लोकही एकत्र आले. मिस्या येथे त्यांनी तळ दिला.

शास्ते 11:4

काही काळानंतर अम्मोनी लोकांची इस्राएल लोकांबरोबर लढाई झाली.

शास्ते 15:15

तेव्हा शमशोनला तिथे एका मृत गाढवाचे जबड्याचे हाड सापडले. त्याच्या साहाय्याने त्याने एक हजार पलिष्टी लोकांना ठार केले.

1 शमुवेल 4:1

इस्राएलभर शमुवेलचे नाव झाले. एली आता फार वृध्द झाला होता. त्याच्या मुलांचे दुर्वर्तन चालूच होते.याच सुमारास सर्व पलिष्टी इस्राएल लोकांविरुध्द एकत्र आले. इस्राएल लोक त्यांच्याशी लढण्यास निघाले. त्यांचा तळ एबन एजर येथे तर पलिष्ट्यांचा अफेक येथे होता.

1 शमुवेल 13:19

इस्राएलमध्ये लोहार नव्हते. त्यामुळे त्यांना लोखंडाच्या वस्तू करता येत नसत. पलिष्ट्यांनीही त्यांना ही विद्या शिकवली नाही कारण ते लोखंडी भाले, तलवारी करतील ही त्यांना धास्ती होती.

1 शमुवेल 17:47

लोकांचे रक्षण करायला परमेश्वराला तलवार, भाल्यांची गरज नसते हे इथे जमलेल्या सगळ्यांना कळून चुकेल. हे परमेश्वराचे युध्द आहे. तुम्हा पलिष्ट्यांच्या पराभव करायला देव आमचा पाठिराखा आहे.”

1 शमुवेल 17:50

अशा प्रकारे निळळ गोफण धोंड्याच्या साहाय्याने त्याने पलिष्ट्याला ठार केले. दावीदकडे तलवार नव्हती.

1 करिंथकरांस 1:17

कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले, ती भाषणाच्या ज्ञानाने नव्हे, तर अशासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य निरर्थक होऊ नये.

Interlinear

Choose Theme