Home Bibles शास्ते 3:16 · मराठी बायबल
शास्ते 3:16 · मराठी बायबल

एहूदने एक अठरा इंचलांबीची दुधारी तलवार बनवून घेतली आणि ती उजव्या मांडीवर कपडचांखाली झाकली जाईल अशी बांधली.

Cross references

शास्ते 3:21

राजा उठल्याबरोबर उजव्या मांडीवर बांधलेली तलवार एहूदने डाव्या हाताने उपसली आणि राजाच्या पोटात खुपसली.

स्तोत्रसंहिता 45:3

तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान, तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर.

स्तोत्रसंहिता 149:6

लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.

गीतरत्न 3:8

ते सगळे प्रशिक्षित लढवय्ये आहेत. त्यांच्या बाजूला त्यांच्या तलवारी आहेत. रात्री येणाऱ्या कुठल्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.

इब्री लोकांस 4:12

कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे.

प्रकटीकरण 1:16

त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली.तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.

प्रकटीकरण 2:12

“पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी तीक्ष्ण तरवार आहे, त्याचे हे शब्दआहेत,

Interlinear

Choose Theme