या बाराहजार सैनिकांना याबेश-गिलादमध्ये चारशे तरुण कुमारिका आढळल्या त्यांना त्यांनी कनानातील शिलो येथील छावणीत आणले.
Cross references
सर्व इस्राएल लोक शिला येथे एकत्र जमले. तेथे त्यांनी सभामंडप उभारला. आता देश इस्राएल लोकांच्या हाती आला होता. त्यांनी त्या भागातील शत्रूना नामोहरण केले होते.
बन्यामीन वगळता, इस्राएल लोकांच्या सर्व टोव्व्यांनी चार लाख लढवय्ये जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता.
यावर इस्राएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यानी विचारणा केली.परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करुन गेले.
देवाने शिलोहचा पवित्र तंबू सोडून दिला. देव लोकांच्या बरोबर त्यांच्या तंबूत राहिला.
“यहूदातील लोकांनो, आता तुम्ही शीलो गावात जा. माझ्या नावाचे पहिले घर मी जेथे बांधले, तेथे जा. इस्राएलमधील लोकांनीसुध्दा दुष्कृत्ये केली. त्याबद्दल मी काय केले, ते जाऊन पाहा.