बन्यामीनांनी इस्राएलांचा हल्ला परतवला आणि त्यांनी आणखी अठरा हजार माणसांना ठार मारले. युध्दात कामी आलेले सर्व सैनिक चांगले तरवारबहाद्दर होते.
Cross references
त्या ठिकाणाचे नाव लूज होते परंतु याकोबाने त्याचे नाव बेथेल ठेवले.
यहोशवाने हे ऐकले तेव्हा दु:खाने त्याने आपली वस्त्रे फाडली. पवित्र करार कोशापुढे त्याने लोटांगण घातले. संध्याकाळपर्यंत तो तसाच पडून राहिला. इस्राएलच्या प्रमुखांनीही तसेच केले. दु:खाने, त्यांनीही आपल्या डोक्यात माती घालून घेतली.
यहोशवाने इस्राएल लोकांच्या सर्व वंशांना शखेम येथे एकत्र बोलावले. इस्राएलीं पैकी वडीलधारी मंडळी, न्यायाधीश, प्रमुख, अधिकारी या सर्वांना पुढे बोलावले. ही मंडळी परमेश्वरासमोर उभी राहिली.
बन्यामीन वगळता, इस्राएल लोकांच्या सर्व टोव्व्यांनी चार लाख लढवय्ये जमा केले त्या चार लाखांपैकी प्रत्येकाकडे तलवारी होत्या त्यातील प्रत्येक जण प्रशिक्षित सैनिक होता.
यावर इस्राएल लोकांनी संध्याकाळ होईपर्यंत परमेश्वराची करुणा भाकली. आपल्याच बांधवांवर पुन्हा हल्ला करावा का, अशी त्यानी विचारणा केली.परमेश्वराने त्यांना पुन्हा निर्धाराने चालून जाण्यास सांगितले तेव्हा एकमेकांना धीर देत आदल्या दिवसाप्रमाणेच ते बन्यामीनांवर चाल करुन गेले.
इस्राएल लोक मग बेथेल येथे गेले. संध्याकाळपर्यंत ते तिथे परमेश्वरासमोर बसून राहिले. दु:खाने ते मोठमोठ्यानेे ओरडत होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एक वेदी बांधली आणि यज्ञार्पणे, शांति अर्पणे केली.
मग सर्व इस्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपासाला सुरुवात झाली. अन्नापाणी वर्ज्य करुन त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इस्राएलमध्ये न्याय निवाडा करत असे.
दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको “असे तो बोलला होता.”
यहोशाफाट घाबरला आणि त्याने याबाबतीत परमेश्वराला काय करावे विचारायचे ठरवले. त्याने यहूदामध्ये सर्वांसाठी उपवासाची घोषणा केली.
तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता.
तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले.
‘उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल’, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.
परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा.
निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.