पण हा लेवी मालक त्याला म्हणाला, “हे शहर आपल्याला परके आहे. येथील लोक इस्राएल वंशाचे नाहीत. तेव्हा इथे राहायला नको. आपण गिबा येथे जाऊ.”
Cross references
गिबोन, रामा, बैरोथ.
सेला, ऐलेक, यबूसी (म्हणजेच यरूशलेम गिबाथ आणि किर्याथ ही चौदा नगरे आणि आसपासची गावे सुध्दा बन्यामीनाच्या वंशजांना मिळाली.
शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. शूर सैनिकांना परमेश्वराकडून प्रेरणा मिळाली आणि त्यांनी शौलचे अनुयायित्व पत्करले.
त्याने इस्राएलमधून तीन हजार माणसे निवडली. त्यापैकी दोन हजार मिखमाश येथे त्याच्या बरोबर बेथेलच्या डोंगराळ प्रदेशात राहिली. हजार जण योनाथान बरोबर बन्यामीनमधील गिबा येथे राहिले. सैन्यातील इतर सर्वांना त्याने घरोघरी पाठवले.
ते ‘उताराच्या’ (माबाराच्या) येथे नदी ओलांडतील, गेबा येथे ते मुक्काम करतील. रामा घाबरून जाईल. शौलच्या गिबातील माणसे पळून जातील.
“गिबात शिंग फुंका, रामात तुतारी फुंका. बेथ-आवेनमध्ये इषारा द्या. बन्यामीन, तुझ्यामागे शत्रू लागला आहे.